शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्करांची मुजोरी

By admin | Updated: July 17, 2014 00:44 IST

प्रशासन हतबल: कर्मचाऱ्यांना मारहाण; पथकावर दगडफेक

अक्कलकोट: गुड्डेवाडी (ता. अक्कलकोट ) येथील भीमा नदीपात्रात विनापरवाना वाळू तस्करी करणाऱ्यांना रोखण्यासाठी गेलेल्या महसूलच्या पथकावर २०० जणांनी दगडफेक केली. या पथकास मारहाण करुन पळवून लावले. पोलीस प्रशासनाला कारवाईऐवजी हात हलवत परत जावे लागले. पथकातील कर्मचाऱ्यांना जीव वाचविण्यासाठी स्वसंरक्षणार्थ बंदूक दाखवावी लागली. कर्नाटकातील इंडी तालुक्यातील बरगुड गावातील तस्कर महाराष्ट्र हद्दीतील अक्कलकोट तालुक्यातील गुड्डेवाडी भीमा नदीपात्रात येऊन वाळू घेऊन जातात. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार चालू आहे. तब्बल ५० वाहनांमधून रोज वाळू चोरी करुन ८० टक्के साठा संपुष्टात आणला आहे. बुधवारी दुपारी पावणेबारा वाजता अव्वल कारकून संतोषकुमार हिरेमठ, मंगरुळचे तलाठी शिवप्पा कोळी, शेगाव तलाठी व्हनप्पा कोळी, केगावचे तलाठी राहुल गोकुळ, आळगे, कोतवाल अवधूत, शेगाव कोतवाल शिवशरण कोळी, मंगरुळ कोतवाल बंदेनवाज दफेदार, सहायक फौजदार भोई, पो. कॉ. आवताडे, भोसले हे पथक नदीपात्रात जाताच तब्बल दोनशे जणांनी अंगावर धावून येत कारकून हिरेमठ, कोतवाल कोळी व बंदेनवाज या तिघांना लाथाबुक्यांनी मारहाण करुन पथकाच्या दिशेने दगडफेक केली. परिस्थिती लक्षात घेऊन पथक हात हलवत परत आले. याबाबत अज्ञातांविरुद्ध दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फिर्याद संतोषकुमार हिरेमठ यांनी दिली आहे.-------------------------तलाठ्याच्या बंदुकीमुळे जीव वाचलामहत्त्वाचे पोलीस, महसूल अधिकारी नसताना अशा प्रकारे गाफीलपणाने कमी दर्जाच्या कर्मचाऱ्यांना कारवाईसाठी पाठविणे ही प्रशासनाची बेफिकिरीच आहे. तस्करांचे हिरेमठ हे लक्ष ठरले होते. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास प्रारंभ केला. जीव वाचविण्यासाठी तलाठी शिवप्पा कोळी यांच्याजवळ असणाऱ्या बंदुकीमुळे पथक सुरक्षित परत आल्याची चर्चा सुरू होती.महसूलच्या पथकावर २०० जणांच्या जमावाकडून दगडफेक महसूल विभागाच्या पथकासोबत पोलिसाही हतबलतीघा कर्मचाऱ्यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाणतब्बल ५० वाहनांमधून रोज निरंतर होते वाळू चोरी