शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

‘भगवा’ राज्य व्यापणार

By admin | Updated: July 21, 2014 01:21 IST

उद्धव ठाकरे यांचा विश्वास : सेनेच्या उमेदवाराला निवडून द्या

बार्शी: राज्यातील सत्ताधारी सरकार सूडबुद्धीने कारभार करीत असून, येणाऱ्या निवडणुकीत भगवंताच्या आशीर्वादाने बार्शीमधून फडकणारा भगवा राज्य व्यापेल व महाराष्ट्र भगवामय होईल, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी बार्शी येथे झालेल्या जाहीर सभेत व्यक्त केला़ येथील भगवंत मैदानावर ‘माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री रामदास कदम, संपर्कप्रमुख विश्वनाथ नेरुरकर, खा. रवींद्र गायकवाड, आ. ओमराजे निंबाळकर, सहसंपर्कप्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, तानाजीराव सावंत, माजी आ. ज्ञानेश्वर पाटील, दिनकर माने, उत्तमप्रकाश खंदारे, शिवशरण पाटील, रविकांत पाटील, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले,अरूण बारबोले, रावसाहेब मनगिरे,भाऊसाहेब आंधळकर, संतोष निंबाळकर, दीपक आंधळकर आदी मान्यवर उपस्थित होते.मला माझ्या जुन्या सभेची आठवण होते. २००४ साली याच मैदानावर सभा घेतली होती. तोच उत्साह, तिच गर्दी, तशीच रोषणाई, तशीच आतषबाजी आजही पहावयास मिळते आहे. २००४ ला झालेल्या विजयाची या निवडणुकीतही पुनरावृत्ती होईल. नव्हे तर भगवंत बार्शीबरोबरच राज्यात सत्ता येण्यासाठी आशीर्वाद देईल़ भगवंताचा भगवा झेंडा खाली उतरला नाही पाहिजे, बार्शीचा आमदार सेनेचा झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.सेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विरोधकांना उमेदवार शोधावे लागत आहेत, असा टोला त्यांनी लागावला. स्वत:च्या तुंबड्या भरणाऱ्या काँग्रेसवाल्यांचा एकही आमदार निवडून येता कामा नये. असा आवाहन त्यांनी केले़ यावेळी रामदास कदम, खा. रवींद्र गायकवाड, भाऊसाहेब आंधळकर, सभापती कौशल्या माळी, उपसभापती केशव घोगरे, अस्मिता गायकवाड, श्रीधर कांबळे, किशोर मांजरे, राजा काकडे, प्रा. अशोक सावळे, दीपक आंधळकर यांचीही भाषणे झाली़-------------------------अजित पवारांना प्रतिआव्हानसंपूर्ण राज्यात शिवसेनेच्या सभांना होत असलेली गर्दी ही सेनेवर प्रेम करणाऱ्या सैनिकांची आहे. अशी गर्दी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जमवून दाखवावी, असे आव्हान ठाकरे यांनी दिले. कृषिमंत्री शरद पवारांना सत्तेत असताना पंतप्रधानांना भेटावेसे वाटले नाही. मात्र आमची सत्ता आल्यावर पंतप्रधानांना भेटावयास जाता. मग सत्तेत होता त्यावेळी काय करीत होता, त्यांना धरणांपेक्षा लावासासारखी शहरे उभी करावेसे वाटते, असा टोला ठाकरे यांनी हाणला़