शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सचिन... आमच्या ‘बापा’साठी कधी ट्विट करशील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:25 IST

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष केलेल्या परंतु पॉप सिंगर रिहाना हिने दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर ट्विट ...

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष केलेल्या परंतु पॉप सिंगर रिहाना हिने दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर ट्विट केले. यानंतर सचिनने केलेल्या ट्विटमुळे भारतरत्न सचिन तेंडुलकर सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होत आहे. आज पंढरपूरच्या शेतकऱ्याच्या मुलाने थेट ‘सचिन’च्या घरी जाऊन आमच्या ‘बापा’साठी कधी ट्विट करशील! असा सवाल केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रवक्ता रणजित बागल (रा. गादेगाव, ता. पंढरपूर) असे त्या युवकाचे नाव आहे. दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. राज्यात राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरुवातीपासून या आंदोलनास पाठिंबा देत राज्यात आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान पॉप सिंगर रिहाना हिने दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर ट्विट केल्यानंतर जगभरात या आंदोलनावर चर्चा सुरू झाली.

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने यासंदर्भात ट्विट करून बाहेरच्या व्यक्तीने आमच्या देशातील प्रश्नात लक्ष घालू नये, अशा प्रकारचे ट्विट केले होते. शेतकरी आंदोलनावर ट्विट न करणाऱ्या सचिन तेंडुलकरवर त्यामुळेच ट्विटर युजर्स संतापले अन‌् त्यांनी सचिनला ट्रोल केले. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीचे युवा प्रवक्ता रणजित बागल यांनी आज मुंबईत जाऊन सचिन तेंडुलकर याच्या घरासमोर आंदोलन केले. शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील असा सवाल विचारला.

हातात डिजिटल फलक घेऊन रणजित बागल याने सचिनला जाब विचारला. त्याच्या या आंदोलनामुळे राज्यभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. सचिनला जाब विचारणाऱ्या रणजित बागल याचे राज्यभर कौतुक होत आहे.

फोटो लाईन ::::::::::::::::::

भारतरत्न सचिन तेंडूलकर यांच्या घरासमोर सचिन... आमच्या बापासाठी कधी ट्विट करशील, असा डिजीटल फलक घेऊन आंदोलन करताना रणजित बागल.