शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

धावा.. धावा.. आहे पंढरी विसावा!

By admin | Updated: July 13, 2016 03:45 IST

तुकाराम महाराजांचा हा अभंग आळवित बोंडलेच्या माळरानावर श्रीसंत तुकाराम महाराज पालखीतील वारकऱ्यांनी धावा केला. या वेळी पंढरपूर येत असल्याचा आनंद वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता

मोहन डावरे, पटवर्धन कुरोली (सोलापूर)तुका म्हणे धावा आता।आहे पंढरी विसावा।।तुकाराम महाराजांचा हा अभंग आळवित बोंडलेच्या माळरानावर श्रीसंत तुकाराम महाराज पालखीतील वारकऱ्यांनी धावा केला. या वेळी पंढरपूर येत असल्याचा आनंद वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. त्यामुळे कसलाही थकवा न जाणवता वारकऱ्यांनी बोरगाव मुक्काम आटोपून धावा करत पिराची कुरोली मुक्कामी मार्गस्थ झाला. श्रीसंत तुकाराम महाराज विठोबांच्या भेटीला यायचे त्या वेळी अकलूज, माळीनगर, बोरगाव, श्रीपूर, माळखांबीमार्गे पंढरपूरकडे येत होते. वाटेवरील बोंडलेच्या माळरानावर येत असताना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा दिसणारा कळस पाहून आनंदीत होऊन ‘‘धावा धावा आहे पंढरी विसावा’’ असे म्हणत बोंडलेच्या माळरानावरून पंढरपूरकडे धावत जात होते. तेव्हापासून या माळरानावर धावा करण्याची प्रथा सुरू आहे.बोरगावकरांचा मुक्काम व पाहुणचार आटोपून सोहळ्याने भल्या सकाळी पिराची कुरोलीकडे वाटचाल केली. ढगाळ वातावरण, अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरी, हिरवीगार झालेली धरती, अशा आल्हाददायी वातावरणात बोरगाव, तोंडले-बोंडलेमार्गे वैष्णवांची आगेकूच केली होती. दुपारी १च्या सुमारास बोंडलेच्या माळरानावरून या वैष्णवांचा मेळा टप्प्याटप्प्याने वीणेकरी, टाळकरी, झेंडेकरी, हंडेकरी महिला, तुळशीधारी महिला आदींसह विविध भक्तांनी टप्प्याटप्प्याने बोंडलेच्या माळरानावर श्रीसंत तुकारामांचा अभंग आळवित उत्साहात धावा केला.धाव्याचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी पंढरपूर तालुक्यासह माळशिरस तालुक्यातील भाविकांनी दुपारी बोंडलेच्या माळरानावर मोठी गर्दी केली होती. या धाव्यानंतर सायंकाळी ५ वा. सोहळा पिराची कुरोली (ता. पंढरपूर) येथे विसावला.