कुर्डूवाडी : म्हैसगाव (ता. माढा) परिसरात वाघ दिसल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या ८ ते १० दिवसांपासून ही चर्चा सुरू आहे. दि.७ रोजी रोजी रात्रीच्या सुमारास धनाजी अच्युत जगताप (रा. गांधलेवस्ती) यांच्या शेळीला वाघाने खाल्ले पण गोंधळ झाल्याने तसाच लचका तोडून तो पळून गेला. याच वस्तीवर हनुमंत जगताप हे गाडीवरुन जात असताना त्यांनाही वाघ दिसला. गेल्या ८ दिवसांपूर्वी म्हैसगावातील पापनसकडच्या बाजूला एकाची शेळी वाघाने खाल्ली होती. सदरची चर्चा झाल्यावर वनखात्याचे लोक येऊन गेले मात्र त्यांनी तो वाघ नसल्याचे खुणांवरुन सांगितले.
वाघ दिसल्याच्या अफवेने घबराट
By admin | Updated: May 9, 2014 00:32 IST