शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

रिझर्व्ह बँकेकडून ३१० कोटींचा अतिरिक्त निधी गारपीट अनुदान; सोलापूर जिल्‘ाच्या मागणीची झाली पूर्तता

By admin | Updated: May 7, 2014 19:16 IST

सोलापूर:

सोलापूर: रिझर्व्ह बँकेने भारतीय स्टेट बँक ट्रेझरी शाखेला ३१० कोटींचा अतिरिक्त पुरवठा केल्याने गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना पैसे मिळण्याची अडचण दूर झाली आहे. जिल्हा बँकेलाही पैसे दिले असल्याचे सांगण्यात आले.जिल्‘ातील गारपीट पीक नुकसानीची रक्कम मिळत नसल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत. विशेषत: जिल्हा मध्यवर्ती बँकेतून शेतकर्‍यांना पैसे दिले जात नसल्याची तक्रार आहे. लोकसभा निवडणूक व गारपीट अनुदान वाटप एकाच वेळी आल्याने निधी उपलब्ध करण्यासही रिझर्व्ह बँकेला अडचण झाली होती. शेतकर्‍यांची बँक खाती जिल्हा बँकेत असल्याने गारपीट अनुदानाची रक्कमही याच बँकेत जमा होणार आहे. जिल्हा बँकेने यासाठी भारतीय स्टेट बँक ट्रेझरी शाखेकडे ४०० कोटींची तर बँक ऑफ इंडियाकडे १०० कोटींची मागणी केली होती. रिझर्व्ह बँकेकडूनच पैसे मिळत नसल्याची अडचण ट्रेझरी शाखेसमोर होती. ती अडचण आता दूर झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने सोलापूरसाठी अतिरिक्त ३१० कोटी रुपये दिले असून ही रक्कम गारपीट व दुष्काळी मदत वाटपासाठी उपयोगी पडणार आहे. जिल्हा बँकेला मागील आठवड्यात ५५ कोटी रुपये ट्रेझरी शाखा व अन्य बँकेने दिले होते. -----------------आता पैसे शिल्लक..अनुदान येईना?गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्याची घाई लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान होती. जिल्हाधिकार्‍यांच्या दबावामुळे तहसीलदारांनी घाईने बँकांना धनादेश दिले, परंतु बँकांकडे खातेदाराला देण्यासाठी पैसेच नव्हते. आता रिझर्व्ह बँकेने अतिरिक्त ३१० कोटी रुपये दिले असले तरी आता तहसीलदारांकडून बँकांना धनादेश दिले जात नाहीत. दुष्काळाची २६८ कोटींची मदत वाटप करावयाची असली तरी तहसीलची यंत्रणा काही केल्या हलेना झाली आहे. गारपीट नुकसानीच्या तिसर्‍या हप्त्याची ७२ कोटींची रक्कमही शासनाकडून मिळेना झाली आहे. त्यामुळे आता बँकांकडे पैसे शिल्लक असले तरी यंत्रणेकडून धनादेश व शेतकर्‍यांची यादी मिळेना झाली आहे.