यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सम्यक डायरेक्टर, आंतरराष्ट्रीय व्याख्याते आनंद पवार हे होते. त्यांनी आपल्या भाषणात स्त्री पुरुष समानता, रोजगार निर्मिती व जातिभेद निर्मूलनाविषयी आपलं विचार व्यक्त केले. यावेळी कुर्डूवाडी आयएमआयचे अध्यक्ष डॉ. आशिष शहा, निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ. विश्वेश्वर माने, कापड दुकानदार संघटना अध्यक्ष विकास संचेती, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष परेशजी कोठारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी रो. जगन्नाथ बापू क्षीरसागर यांची सोलापूर विद्यापीठाच्या स्मारक समितीवर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रोजेक्ट डायरेक्टर नागनाथ कुबेर, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्राचार्य रवी सुरवसे, सचिव डॉ. सचिन गोडसे, डॉ. रवींद्र बोबडे, डॉ. प्रद्युम्न सातव, कॅप्टन अजिनाथ बोबडे, रो. मिलिंद कऱ्हाडे, रो. घनश्याम क्षीरसागर, रो. संचेती नीलेश, रो. शितल सुरवसे, प्रा. सुदर्शना दुधे, डॉ. सचिन गोडसे उपस्थित होते.
फोटो ०१कुर्डूवाडी रोटरी
290821\57105807img-20210828-wa0296.jpg
कुर्डूवाडीत रोटरी क्लबच्या वतीने गरजूंना छत्रीचे वाटप करताना जेष्ठ साहित्यिक आनंद पवार,अध्यक्ष रवी सुरवसे,डॉ आशिष शहा,डॉ रवींद्र बोबडे,नागनाथ कुबेर आदी