शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आषाढीच्या आयआरएस प्रणालीत राबणार महसूल यंत्रणा

By admin | Updated: July 2, 2016 12:43 IST

'यंदाची आषाढी वारी, निर्मल वारी' या संकल्पनेद्वारे आषाढी वारीचे नियोजन करण्यात आहेत. ज्ञानेश्‍वर महाराज, तुकाराम महाराज यांच्यास इतर संतांच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यात

६५ एकरातील सुविधांमध्ये वाढ - जिल्हाधिकारी रणजीत कुमार  
 
सोलापूर -  'यंदाची आषाढी वारी, निर्मल वारी' या संकल्पनेद्वारे आषाढी वारीचे नियोजन करण्यात आहेत. ज्ञानेश्‍वर महाराज, तुकाराम महाराज यांच्यास इतर संतांच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यात आल्यापासून परत जाईपर्यंत सोईसुविधा देण्यासाठी यंदाही आयआरएस प्रणाली राबविण्यात येणार आहे. त्यात संपुर्ण महसूल यंत्रणा राबणार आहे. 
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढी यात्रेत देशभरातून कानाकोपर्‍यातून भाविक येत असतात. भाविकांना सोईसुविधा देण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर राहणार आहे. त्यात मागील वर्षापासून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीही शासनाच्या ताब्यात असल्याने प्रशासनावर दुहेरी जबाबदारी राहणार आहे. गतवर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कल्पनेतून आषाढी वारीत आयआरएस प्रणाली राबविण्यात आली होती. त्यात जिल्हाधिकार्‍यांपासून ते शेवटच्या कर्मचार्‍यांपर्यंत सर्वांना आषाढीच्या कामात गुंतविण्यात आले होते. ६५ एकरातील सोईसुविधा, पालखी मार्गावर सुविधा, मुक्काम तळावर सुविधा आणि सुलभ दर्शन यासाठी चोख नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे वारकर्‍यांना सुखद वारी अनुभवयाला आली. त्यामुळे यंदाही आयआरएस प्रणाली राबविण्यात येणार आहे. त्यात यंदा राज्य शासन नमामि चंद्रभागा उपक्रमातून पंढरपूरकडे विशेष लक्ष देत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह इतर मंत्र्यांचेही पंढरपूरकडे लक्ष आहे. त्यामुळे यंदाची वारी वेगळी वारी असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनीही वारीकडेच लक्ष केंद्रीत केले आहेत. त्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांच्यावरच यंदाही आयआरएस प्रणालीची जबाबदारी राहणार आहे. त्यासाठी पंढरीत बैठका घेण्यात येत आहे. ज्या ज्या तालुक्यातून पालख्या सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतात, त्या त्या तालुक्यातील अधिकार्‍यांवर स्वच्छतेची आणि सोईसुविधेची जबाबदारी राहणार आहे. वारकर्‍यांना अडचणी येणार नाही, याची संपुर्ण दक्षता येण्यात येत आहे. वारकर्‍यांसाठी आपत्कालीन मदत केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यातून तात्काळ सुविधा देण्यात येणार आहे.