शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Reservation : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल हे शरद पवारांनी जाहीर करावं'; राधाकृष्ण विखे- पाटलांनी स्पष्टच सांगितलं
2
Maratha Reservation : मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला
3
"जीव धोक्यात घालू नका"! मरीन ड्राईव्हवर शेकडो मराठा आंदोलक समुद्रकिनारी खडकांवर उतरले
4
२० तासांचा रहस्यमय प्रवास! चीनला पोहचण्यासाठी किम जोंग यांची सीक्रेट तयारी; शत्रूंना देणार चकवा
5
Maratha Morcha Mumbai: 'मी आयुक्तांना बोलते'; सुप्रिया सुळेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट
6
भाजपच्या माजी आमदार, माजी IPS अधिकाऱ्यासह १४ जणांना जन्मठेप; बिल्डर अन् १२ कोटींचं प्रकरण काय?
7
बाबर आझमची 'मॅचविनिंग' खेळी; शोएब अख्तर, वकार युनिससारख्या दिग्गजांची केली धुलाई
8
ओबीसीतून आरक्षण घेणारच, उद्यापासून पाणीही घेणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची घोषणा
9
तमिळ सुपरस्टार विशालच्या साखरपुड्याचे फोटो पाहिलेत का? १२ वर्षांनी लहान आहे होणारी पत्नी
10
'नरेंद्र मोदींनी चीनला क्लीन चिट दिली', पंतप्रधानांच्या चीन दौऱ्यावरुन काँग्रेस आक्रमक
11
जिओ की वीआय? रोजच्या २.५GB डेटासाठी कोणता प्लॅन स्वस्त? जाणून घ्या दोन्ही कंपन्यांचे फायदे आणि किंमत
12
Gauri Pujan 2025: गौराईला नैवेद्य अर्पण करण्याआधी ताटाखाली काढा पाण्याचे मंडल आणि म्हणा 'हा' मंत्र
13
"मराठा जातीने मागास नाहीत, न्यायालयात अडकवायचं आहे का?"; पाटलांनी सांगितला ओबीसी आरक्षण देण्यातील अडथळा
14
Mumbai: पर्यावरणपूरक मूर्तीच्या नैसर्गिक जलस्रोतात विसर्जनास परवानगी
15
१५ वर्षीय मुलीच्या मागेच लागला साप; १ महिन्यात ६ वेळा चावला, प्रत्येकवेळी पायावर खुणा सोडल्या
16
दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीची मैदानात एन्ट्री; चाहत्यांना सौंदर्याने घायाळ करणारी 'ती' कोण?
17
जातीच्या नावाने हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न; मराठा आंदोलनावरून नितेश राणेंचा दावा
18
"आम्ही भेटायला जाणार होतो पण...", प्रियाच्या निधनाबद्दल समजताच उषा नाडकर्णींना अश्रू अनावर
19
Mumbai: धारावीत मैदान, मोकळ्या जागाच नाहीत; खेळायचे कुठे?
20
Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

दूध भेसळीला लगाम

By admin | Updated: July 29, 2014 01:13 IST

‘महानंद’चा आदेश : वाहनांना अन्न व भेसळ परवाना बंधनकारक

 सोलापूर: सहकाराच्या स्पर्धेत खासगी संघ काढण्याची व ते टिकविण्यासाठी वाट्टेल ते करण्याची स्पर्धा लागल्याने भेसळयुक्त दुधाच्या पुरवठ्याच्या प्रकरणातही वाढ झाली आहे. भेसळयुक्त दुधाच्या तक्रारीला लगाम लावण्यासाठी महानंदने राज्यातील दूध संकलन व वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी अन्न व भेसळ प्रतिबंधक परवाना बंधनकारक केला आहे. येत्या ५ आॅगस्टपासून याची कडक अंमलबजावणी करण्याचा आदेशही काढला आहे.राज्यात अलीकडे खासगीकरणाचे वारे जोरात वाहत आहेत. सहकारी साखर कारखान्यांची संख्या कमी अन् खासगी व सहकारी कारखान्याचे मल्टिेस्टेटमध्ये रुपांतर करण्याची स्पर्धा लागली आहे. जसे साखर कारखान्याचे तसे दूध संकलन करणाऱ्या संघाचे झाले आहे. अलीकडे राज्यात खासगी दूध संकलन करणारे संघ वरचेवर वाढत आहेत. या संख्येत मागील पाच वर्षांत झपाट्याने भर पडत आहे. सहकारी संघाच्या दूध संकलनावर परिणाम झाला असला तरी भेसळयुक्त दुधाच्या तक्रारीतही वाढ होत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न केला जात असला तरीही स्वच्छ व निर्भेळ दूध मिळणे कठीण झाले आहे. यावर उपाययोजना म्हणून गावपातळीवर दूध संकलन करणाऱ्या संस्था, टेंपो व दूध वाहतूक करणाऱ्या टँकरला अन्न व औषध प्रशासन खात्याचा परवाना घेणे बंधनकारक केले आहे.-------------------------आरोग्याची काळजीही वाढलीगाईच्या दुधाला ३.५ टक्के फॅट व ८.५ एस.एन.एफ. (इतर घनघटक, नॉन सॉलिड फॅट) गुण प्रत असणे बंधनकारकप्रत्येक दूध संघासाठी हे बंधनकारक असून अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी तपासणी करुन कारवाई करणारकायद्याचे पालन न करणाऱ्या संस्था व वाहनांवर कडक कारवाई करणारमहानंदने राज्यातील दूध संघांना कडक निर्देश देताना दूध संकलन करणाऱ्या संस्था व वाहनाकडे परवाना बंधनकारक असल्याचे म्हटले आहे२७ जानेवारी २०१४ रोजी अन्न व औषध आयुक्तांनी यासंबंधी घेतलेल्या बैठकीत झाला निर्णयया निर्णयाच्या कडक अंमलबजावणीचे महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद)चे वरिष्ठ व्यवस्थापक (गुणनियंत्रण) यांचे निर्देश--------------------------------मिळालेल्या आदेशानुसार खासगी व सहकारी दूध संघाचे दूध संकलन करणाऱ्या संस्था व वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी परवाना घेण्यासाठी प्रबोधन केले जात आहे. परवाना घेण्यासाठी संस्था व दूध वाहतूक करणारे वाहन चालकही परवाने घेऊ लागले आहेत. ५ आॅगस्टनंतर आदेशाप्रमाणे कारवाई करु. -प्रकाश यादवअन्न सुरक्षा अधिकारी, सोलापूर