शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीचा काढला फोटो; चौघा वाळूमाफियांनी केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:16 IST

मेडशिंगी येथील सचिन पाटील हा तरुण गुरुवारी पहाटे ३ च्या सुमारास नदीवर असलेल्या विहिरीवरील विद्युत पंप चालू करून डाळिंब ...

मेडशिंगी येथील सचिन पाटील हा तरुण गुरुवारी पहाटे ३ च्या सुमारास नदीवर असलेल्या विहिरीवरील विद्युत पंप चालू करून डाळिंब बागेत ड्रीप चालू आहे का? हे बॅटरीने पाहत होता. त्यावेळी अनोळखी व्यक्ती नदीत वाळू भरत असताना बॅटरीचा प्रकाश पाहून पळून गेले. त्याने बागेतील ड्रीप कोणी कापून वगैरे टाकले आहे का? हे पाहत असताना पळून गेलेले नितीन नामदेव पाटोळे, अर्जुन कसबे हे दोघे त्याच्याजवळ आले तर सांगोला येथील रवी शिवाजी भोसले व बबलू शिवाजी भोसले हे दोघे दुचाकीवरून तेथे येऊन नदीवर गेले. दरम्यान सचिन सोनलकर (एमएच ४५ /एजी ८३०४) दुचाकीचा फोटो काढून घराकडे परतला.

सकाळी ६ च्या सुमारास रवी भोसले यांनी सचिन सोनलकर यास फोन करून मरीआई मंदिरासमोर बोलावून घेतले. तेथे नितीन पाटोळे, अमित कसबे, रवी भोसले व बबलू भोसले या चौघांनी तू आमच्या दुचाकीचा फोटो का काढलास? असे म्हणून त्यास शिवीगाळ करत मारहाण केली. सचिन सोनलकर यास डोक्यात मारल्यामुळे चक्कर येऊन खाली पडला. त्यास सागर राऊत व राहुल खडतरे यांनी सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबत सचिन सोनलकर यांनी चौघांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.