शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वाखरी येथील अतिक्रमणे काढून टाका : जिल्हाधिकारी, आषाढी यात्रेबाबत नियोजन बैठक

By admin | Updated: June 6, 2017 17:14 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि. 0६ :- पिराची कुरोली, वाखरी येथील अतिक्रमणे काढून टाका, अशा सूचना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आज येथे दिल्या.जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर यात्रेबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक एस. विरेश प्रभू , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर, जिल्हा नियोजन अधिकारी सजेर्राव दराडे आदी उपस्थित होते.कालावधीत मोबाईल कनेक्टिव्हटी सुरू राहण्यासाठी बीएसएनएल ने अतिरिक्त टॉवर व्हॅन देता येईल का याचा विचार करावा. त्याचबरोबर खासगी कंपन्यांच्या प्रतिनिधिंना याबाबत तयारी बैठकीसाठी बोलवावे व दूरध्वनी सेवा अखंडित राहील याची काळजी घ्यायला हवी. मोबाईल टॉवरची क्षमता वाढवावी.बैठकीत पालखी मार्गावरील रस्ते, पालखी तळाच्या ठिकाणची व्यवस्था, दिंडीत समावेश असलेल्या टँकरना करावयाचा पाणी पुरवठा याबाबत चर्चा झाली. जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले की वारीच्या राहील याची काळजी घ्यायला हवी .मोबाईल टॉवरची क्षमता वाढवावी. जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले की वारीच्या कालावधीत पंढरपूरातील मद्याची दुकाने , मांसाहारी हॉटेल बद राहतील याची दक्षता घ्यावी .अन्न भेसळ प्रशासनाकडून प्रतिबंधक पथके नियुक्त करवीत. त्यासाठी इतर जिल्ह्यातून अधिकारी कर्मचारी यांच्या सेवा मागवून घ्याव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या.यात्रेबाबत संदभार्तील महत्वाचे आदेश लवकरात लवकर काढले जावेत. उपविभागीय अधिकारी स्तरावरील आदेश लवकरात लवकर काढले जावेत . यात्रेच्या कालावधीत मंदिर परिसरात वीज पुरवठा करताना सुरक्षित वायरिंग केले जावे. त्याचबरोबर पालखी तळाच्या परिसरात आणि मार्गावरील वीज जोडण्या याची तपासणी करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. संभाव्य पूरस्थिती विचारात घेऊन पाण्याची पातळी आणि पाण्याचा विसर्ग याबाबत सातत्याने लक्ष ठेवले जावे, अशा सूचना जिल्हाधिकारी भोसले यांनी दिल्या.बैठकीस पंढरपूरचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, कार्यकारी अभियंता सुरेश राऊत , जिल्हा शल्यचिकित्सक मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी, उपविभागीय अधिकारी संजीव जाधव, ज्योती पाटील, शिवाजी जगताप, अन्नधान्य वितरण अधिकारी श्रीमंत पाटोळे, माळशिरसच्या तहसीलदार बाई माने, एसटीचे विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी आदी उपस्थित होते.