शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

रियल इस्टेट बाजारपेठेत उठावाचे पर्व सुरू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 14:07 IST

दोन वर्षांपासून मंदीचा मार झेलत असलेल्या रिअल इस्टेट बाजारपेठेमध्ये उठावाचे पर्व सुरू झाले आहे, असा दावा बिल्डर्सकडून केला जात आहे. घर खरेदीच्या व्यवहारात लक्षणीय वाढ झाली नसली तरी स्वत:च्या घराचे स्वप्न पाहणारे शहरवासीय गृहनिर्माण प्रकल्पाची चौकशी मोठ्या संख्येने करीत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देरिअल इस्टेटसाठी आता चांगला काळ सुरू घराचे स्वप्न पाहणाºयांनी आता तातडीने पावले उचलण्याचा काळप्रधानमंत्री आवास योजनेचा फायदा घेण्याची संधी चांगली

रवींद्र देशमुखलोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : येत्या तीन महिन्यांपर्यंत अल्प उत्पन्न गट आणि मध्यमवर्गीयांना मिळणारा प्रधानमंत्री आवास योजनेच्या व्याज अनुदानाचा लाभ, रिअल इस्टेट नियमन आणि विकास कायदा अर्थात ‘रेरा’ची स्पष्टता आणि तयार सदनिकांना वस्तू आणि सेवा कर लागू होणार नाही, हा फायद्याचा व्यवहार. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून मंदीचा मार झेलत असलेल्या रिअल इस्टेट बाजारपेठेमध्ये उठावाचे पर्व सुरू झाले आहे, असा दावा बिल्डर्सकडून केला जात आहे. घर खरेदीच्या व्यवहारात लक्षणीय वाढ झाली नसली तरी स्वत:च्या घराचे स्वप्न पाहणारे शहरवासीय गृहनिर्माण प्रकल्पाची चौकशी मोठ्या संख्येने करीत असल्याचे चित्र आहे.नोव्हेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीमुळे मोठ्या प्रमाणावर चलन तुटवडा निर्माण झाला. या काळातच ‘जीएसटी’ आणि ‘रेरा’ कायदाही उंबरठ्यावर होता. त्यामुळे ग्राहकांनी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली होती. मंदीमुळे बेजार झालेल्या गृहनिर्माण उद्योगासाठी तर हा काळ अतिशय कठीण होता; पण महाराष्टÑ दिनी ‘रेरा’ची अंमलबजावणी झाल्यानंतर सरकारने आपल्या हिताची काळजी घेतल्याचे ग्राहकांना स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्यामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले. शिवाय विक्रीसाठी तयार असलेल्या सदनिकांना ‘जीएसटी’लागणार नाही, हेही नंतर कळाले. त्यामुळे ही सकारात्मकता अधिकच वाढत गेली. प्रधानमंत्री आवास योजनेत ६ ते १८ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या मध्यमवर्गीयांना डिसेंबरपर्यंत व्याज अनुदान मिळण्याची संधी असल्यामुळे तर रिअल इस्टेट उद्योगातील मंडळींचा आत्मविश्वास अधिकच वाढत गेला. या सकारात्मकतेचा फायदा घेण्यासाठी बिल्डर्सकडूनच स्वस्तातील गृहकर्जाचे प्रस्ताव दिले जाऊ लागले; पण इतके फायदेशीर वातावरण असतानाही रिअल इस्टेटमध्ये एकदम उठाव आला नाही. हे पर्व आता कुठे सुरू झाले असल्याचे दिसत आहे.‘क्रेडाई’चे राज्य उपाध्यक्ष सुनील फुरडे म्हणाले, आता मार्केट सुटलंय. सोलापूरसारख्या शहरात तयार असलेले फ्लॅट्स अगदी मोठ्या संख्येने नसले तरी गरजवंतांसाठी घरे उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांना ‘जीएसटी’चा भार पडणार नाही; पण नंतर मात्र घरांची किंमत १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. अन्य एका येथील प्रथितयश बिल्डरने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर ग्राहकांकडून केवळ विचारणा होत असल्याचे सांगितले. ग्राहक चौकशी करून जातात; पण प्रत्यक्ष व्यवहार होत नाहीत.-----------------रिअल इस्टेटसाठी आता चांगला काळ सुरू झाला आहे. घराचे स्वप्न पाहणाºयांनी आता तातडीने पावले उचलण्याचा काळ आहे. तयार सदनिका उपलब्ध असल्यामुळे त्यांना ‘जीएसटी’चा फटका बसणार नाही. प्रधानमंत्री आवास योजनेचा फायदा घेण्याची संधी चांगली आहे. सोलापुरातील ९० टक्के ग्राहक या योजनेसाठी पात्र होऊ शकतात.- नंदकुमार मुंदडा, अध्यक्ष, ‘क्रेडाई’ सोलापूर शाखा.