शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

दूध दरवाढीसाठी सरकारच्या प्रतिमेला रयत क्रांतीचा दुग्धाभिषेकाने निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:15 IST

भीमानगर : रांझणी (ता. माढा) येथे दूधदरवाढ मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्यावतीने सरकारच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून निषेध करण्यात ...

भीमानगर : रांझणी (ता. माढा) येथे दूधदरवाढ मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्यावतीने सरकारच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून निषेध करण्यात आला.

रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. सुहास पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दूध उत्पादक शेतकर्‍यांना प्रा. पाटील म्हणाले, सध्या महाराष्ट्रातील दूध उत्पादकांच्या दुधाला दर खूप कमी मिळत आहे. दूध उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. संपूर्ण महाराष्ट्रात दूध व्यवसायामध्ये खासगी दूध संघाचे वर्चस्व निर्माण झाले आहे. सरकारने येत्या १० दिवसात दुधाला हमीभाव देऊन दरवाढ द्यावी, अन्यथा राज्यातील दूध पुरवठा रयत क्रांती संघटना बंद पाडेल, असा इशारा दिला आहे. सध्या दुधाला प्रति लिटर १८ ते २० रुपये इतका अत्यल्प दर मिळत आहे.

गाईच्या दुधाला प्रति लिटर ३० रुपये व म्हशीच्या दुधाला प्रति लिटर ६० रुपये हमीभाव करण्यात यावा. पशुखाद्याचे दर वाढले असून शेतकऱ्याला वैरणही विकत आणावी लागत आहे. त्यामुळे दूध धंदा तोट्यात आहे. शेतकरी स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दुग्ध व्यवसायावर अवलंबून असतो. लाॅकडाऊनचे कारण पुढे करीत दुधाचे दर कमी केले आहेत. सरकारने खासगी दूध संघांवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी रांझणीचे माजी सरपंच आप्पा यादव, खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक नारायण गायकवाड, विकास चव्हाण, ओंकार गाडे, पिनू पोळ, अनिल जाधव, देवा माने, गणेश चव्हाण, आबा बागल, भैरू चव्हाण, राहुल पोळ, गणेश पोळ, दादा मदने, अमोल जाधव, वसंत चव्हाण, टिंगरे किरण पोळ, बाळू भिसे, शिवाजी थोरात उपस्थित होते.

----

फोटो : १० रांझणी

रांझणी येथे दूधदरवाढ मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्यावतीने सरकारच्या निषेधात्मक प्रतिमेला दुग्धाभिषेक घालताना प्रा. सुहास पाटील, आप्पा यादव, नारायण गायकवाड, विकास चव्हाण, ओंकार गाडे.