शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरात राष्ट्रवादी व एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, माजी उपमहापौरास मारहाण

By admin | Updated: February 19, 2017 13:41 IST

सोलापूरात राष्ट्रवादी व एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, माजी उपमहापौरास मारहाण

सोलापूरात राष्ट्रवादी व एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, माजी उपमहापौरास मारहाणसोलापूर : नई जिंदगी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली़ या हाणामारीत दोन्ही पक्षांचे चार कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहे़ याच घटनेत माजी महापौर हारूण सय्यद यांनाही मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे़ सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे़ नईजिंदगी परिसरातील हॉटेल अमन समोरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व एमआयएम पक्षाची प्रचार रॅली जात होती़ यावेळी किरकोळ कारणावरून दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये प्रथम शिवीगाळ झाली़ नंतर या शिवीगाळीचे रूपांतर हाणामारीत झाले़ त्यामुळे या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते़ या हाणामारीत इम्रान कलीम शेख (वय ३५ रा़ सिध्देश्वर नगर, सोलापूर), सादीक चाँद शेख (वय ४५ रा़ लोकमान्य नगर, सोलापूर), आसिफ फरीद शेख (वय ३५ रा़ सिध्देश्वर नगर, सोलापूर), जावेद मुस्तफा कल्याणी (वय २८ रा़ साईनाथ नगर, सोेलापूर) हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत़ या चौघांवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ या घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त अपर्णा गिते, सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दसुरकर, सुर्यकांत पाटील यांच्यासह अन्य शहर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी, कमांडो उपस्थित होते़ यावेळी शासकीय रूग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती़