शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

बैलांच्या नांगरटी झाल्या दुर्मीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:36 IST

कृषी व्यवसायात उन्हाळी नांगरटीला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. भविष्यात चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी जमिनीतील पहिली पायरी म्हणजे उन्हाळी नांगरट. ...

कृषी व्यवसायात उन्हाळी नांगरटीला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. भविष्यात चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी जमिनीतील पहिली पायरी म्हणजे उन्हाळी नांगरट. सध्या या नांगरटी अंतिम टप्प्यात आल्या असून रोहिणी व मृग नक्षत्राच्या दृष्टीने शेतीच्या मशागती उरकल्या जात आहेत. अलीकडील काळात यांत्रिकीकरणाच्या मदतीने शेतीच्या मशागतीला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे यापूर्वी बैलांच्या मदतीने होणाऱ्या मशागती अगदी नगण्य होत चालल्या आहेत. मात्र, अद्याप काही ठिकाणी बैलजोडी मशागती करतानाचे दुर्मीळ चित्र तालुक्यात दिसत आहे.

बैलांच्या नांगरटीला होते महत्त्व

एकेकाळी शेती, शेतकरी अन् बैल हे नाते अतूट होते. ज्याच्याकडे जास्त बैल तो शेतकरी श्रीमंत मानला जायचा. थंडी कमी झाली की ज्वारी, गहू, हरभरा, सुगी संपताच सर्वत्र जमिनीच्या नांगरटी सुरू व्हायच्या. हे काम कष्टप्राय असल्याने जमीन मालक इतर शेतकऱ्यांना नांगरणीसाठी आमंत्रण देत असत. याला ‘इरजीक’ म्हणत. यासाठी अनेक शेतकरी बैलजोडी घेऊन नांगरणी करीत व सायंकाळी त्याच शेतात जेवणाचा आस्वाद घेतला जाई. एकमेकांच्या शेतीकामात मदत करीत कामे पूर्ण केली जायची. बैलाच्या नांगरणीमुळे जमीन तुडवली जात नाही. शिवाय शेताच्या बांधापर्यंत मशागत होते. या नांगरामागे फिरणारे पक्षी जमिनीतील विषारी जिवाणू खातात. अशा अनेक गोष्टींमुळे बैल शेतीला फार महत्त्वाचे होते. मात्र आता बैल शेती दुर्मीळ होत आहे.