शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शाहीर शेख जन्मशताब्दीनिमित्त रॅली

By admin | Updated: October 22, 2015 21:12 IST

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सिंहाचा वाटा असलेले बाश्रीचे सुपुत्र कॉ. शाहीर अमर शेख यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाश्रीतील भगवंत मैदानावरून विद्यार्थ्यांनी रॅली काढली.

 बाश्री : संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सिंहाचा वाटा असलेले बाश्रीचे सुपुत्र कॉ. शाहीर अमर शेख यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाश्रीतील भगवंत मैदानावरून विद्यार्थ्यांनी रॅली काढली. यावेळी शाहीर अमर शेख अमर रहे, अमर शेख जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या.ही रॅली येथील फुले-शाहू-आंबेडकर-अण्णाभाऊ-अमर शेख प्रतिष्ठान यांच्या वतीने काढण्यात येऊन रॅलीचा शुभारंभ कॉ. तानाजी ठोंबरे यांच्या हस्ते अमर शेख यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आला. या रॅलीचा समारोप न्यायालयासमोरील पुतळा पार्क येथील अमर शेख यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून करण्यात आला. यावेळी बोलताना कॉ. तानाजी ठोंबरे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आपल्या पहाडी आवाजाने शाहिरीच्या माध्यमातून अमर शेख यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासोबत राहून महाराष्ट्र ढवळून काढला. यावेळी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नंदन जगदाळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप अलाट, कार्याध्यक्ष बापू शितोळे, सचिव उमेश पवार, विनायक माळी, शौकत शेख, प्रवीण मस्तुद, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आंनद काशीद, किरण गाढवे आदी मान्यवर उपस्थित होते. या रॅलीचे सर्व सूत्रसंचालन सचिव उमेश पवार यांनी केले. तर यामध्ये बाश्रीतील अनेक नागरिकही मोठया प्रमाणात सहभागी झालेले दिसत होते.(प्रतिनिधी) शाहीर अमर शेख यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन करताना कॉ. तानाजी ठोंबरे, जयकुमार शितोळे, संदीप आलाट, उमेश पवार तर दुसर्‍या छायाचित्रात बाश्री शहरात फुले-शाहू-आंबेडकर-अण्णाभाऊ-अमर शेख प्रतिष्ठान यांच्या वतीने काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी विद्यार्थी या रॅलीमध्ये शहरातील मॉडेल हायस्कूल, महाराष्ट्र विद्यालय, कन्या प्रशाला, सिल्व्हर ज्युबिली, साधना कन्या प्रशाला, जिजामाता कन्या प्रशाला, शं.नि. अध्यापक विद्यालय, कुंकूलोळ प्रशाला, सुलाखे हायस्कूल, सोजर इंग्लिश मीडियम हायस्कूलमधील मुले, मुली व शिक्षक सहभागी होऊन शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली नेण्यात आली.