शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

जिल्ह्यात सर्वत्र पावसाने सरासरी ओलांडली

By admin | Updated: September 3, 2014 00:48 IST

मागील वर्षीपेक्षा अधिक पाऊस : काही तलावही भरले

सोलापूर : यंदा उच्चांकी ऊस गाळपासाठी साखर कारखाने सज्ज झालेले असतानाच उजनी धरणाची वाटचाल १०० टक्के भरण्याकडे सुरू आहे. अशातच पावसाने सरासरी ओलांडली असल्याने पाण्याची चिंता कमी झाली आहे.यंदा आजपर्यंतचे उच्चांक मोडेल इतके ऊस गाळप होईल सोलापूर जिल्ह्यात असा अंदाज साखर आयुक्त कार्यालयाचा आहे. एक कोटी ७० लाख इतके गाळप होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सर्वच साखर कारखाने सुरू झाले असले तरीही ऊस शिल्लक राहील असे चित्र आहे. असे असले तरी पाऊस लांबल्याने शेतकरी धास्तावला होता. यंदा पाऊस कमी असल्याचा सर्वांचा अंदाज असताना मघा नक्षत्राने सोलापूर जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. मागील आठवडा शेतकऱ्यांसाठी चांगला ठरला असून या आठवड्यात जिल्हाभरात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षी जिल्ह्यातील काही लघू व मध्यम प्रकल्पाला पाणी आले आहे. काही तलाव १०० टक्के भरले असून काही तलावात अंशत: पाणी आले आहे. काही तलाव अद्याप तळपातळीला आहेत. परंतु उशिराने उजनी धरण भरण्याकडे वाटचाल सुरू आहे. पुणे जिल्ह्यातून अशाच पद्धतीने पाणी येत राहिले तर आठवडाभरात उजनी धरण १०० टक्के भरण्याचा अंदाज आहे.---------------------------सर्वच तालुक्यात सरासरी ओलांडलीमागील आठवड्यापर्यंत पावसाची आशेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना पाऊस चांगला झाल्याने आनंद झाला आहे. सर्वच्या सर्व ११ तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. जून, जुलै व आॅगस्ट महिन्यात एकूण ३५०६ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ३५५५ मि.मी. पाऊस पडला आहे. मागील वर्षी आॅगस्टअखेरपर्यंत ३ हजार ४७ मि.मी. पाऊस पडला होता. ---------------------------------तालुकानिहाय पाऊसप्रत्येक तालुक्यात एक ते १० मि.मी. दरम्यान सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. उत्तर सोलापूर- ३३९ मि.मी., दक्षिण सोलापूर- ३०९ मि.मी., बार्शी- ३१० मि.मी., अक्कलकोट- ३५१ मि.मी., पंढरपूर-३०७ मि.मी., मंगळवेढा-३२३ मि.मी., सांगोला- ४२७ मि. मी., माढा-२८४ मि.मी., मोहोळ-२९० मि.मी., करमाळा- ३३३ मि.मी., माळशिरस- २८० मि.मी. एकूण-३५५५ सरासरी- ३२३ मि.मी.