सोलापूर : अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आज दुपारी आणि सायंकाळी शहरातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या़ पावसाने शहराबरोबर ग्रामीण भागालाही दिलासा दिला़ पाऊस नसल्याने ग्रामीण भागात वाईट अवस्था होती़ रोहिणी, मृग व आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या ़ शहरात कडक ऊन व उकाडा जाणवत होता़ भरदुपारी घामाच्या धारा निघायच्या़ आज दिवसभरात ढगाळलेले वातावरण पाहायला मिळाले़ दुपारी जुळे सोलापूरसह हद्दवाढ भागात पावसाच्या सरी कोसळल्या़ सायंकाळी हवेत गारवा निर्माण झाला़
सोलापूर शहरात पाऊस
By admin | Updated: July 7, 2014 01:05 IST