शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दुधनीत जुगार अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:24 IST

पाच लाखांचा मुद्देमाल जप्त लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकोट : दुधनी (ता. अक्कलकोट) येथील एका सिनेमा थिएटरमध्ये सुरू असलेल्या ...

पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क

अक्कलकोट : दुधनी (ता. अक्कलकोट) येथील एका सिनेमा थिएटरमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत जवळपास पाच लाखांच्या रोकडसह मुद्देमाल जप्त करण्यात आला.

१० सप्टेंबर रोजी साडेसहा वाजता दक्षिण पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

दुधनी येथील शांभवी हॉटेलच्या बाजूला असलेल्या बालाजी सिनेमागृहात लाखो रुपयांचा जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांना मिळाली होती. अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप काळे यांच्या पथकाने धाड टाकली. कारवाईदरम्यान कर्नाटकमधील कलबुर्गी जिल्ह्यातील १६ आरोपी, तीन मोटारसायकली, जीप, लाख रुपये रोख, सव्वा लाखाचे मोबाईल, पावणेतीन लाखांची वाहने असा जवळपास पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

रात्री उशिरापर्यंत दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. कारवाईत हवालदार अजय भोसले, संजय जाधव, श्रीकांत चव्हाण, अश्पाक मिय्यावाले आणि तीन होमगार्ड यांनी सहभाग नोंदवला.

-----------

फोटो : १० अक्कलकोट क्राईम

दुधनी येथे टाकलेल्या धाडीत जुगार खेळणाऱ्यांना दक्षिण पोलीस ठाण्याच्या पथकाने पकडून कारवाई करताना पोलीस निरीक्षक प्रदीप काळे आणि त्यांचे पथक.