यावेळी मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डुनगे, राष्ट्रीय सचिव हरिष देखणे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विष्णू भोसले, सुजाता भाटे, दीपक ओव्हाळ, सिद्धीदा मोरे, मनीषा राऊत, किरण सूर्यवंशी, वसंत मोहिते, मिलिंद वैद्य, किसन भोसले, शांती सागर भुसारी, तुकाराम कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोहोळचे तहसीलदार राजशेखर लिंबारे म्हणाले, दैनंदिन जीवनात वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी जनता व अधिकारी यांची सांगड घालणे महत्त्वाचे आहे. यावेळी फौजदारी कायदे व मानव अधिकार भारतीय राज्यघटना माहिती अधिकार कायदा या विषयावर ॲड. सादिक अली सय्यद आणि डॉ. महेश देसाई यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी कुमार ढवळे, संजय आठवले, शशिकांत ठोकळे, प्रा. अशोक पाचकुडवे, धनंजय आवारे, अक्षय आठवले, आदर्श ढवळे, विकास ढवळे यांनी परिश्रम घेतले.
-------
फोटो : १३ लांबोटी
फौजदारी कायदे व मानव अधिकार भारतीय राज्यघटना माहिती अधिकार कायदा या विषयावर बोलताना सादिक अली सय्यद.