पंढरपूर : पंढरपुरात कार्तिकी एकादशी ३ नोव्हेंबरला आहे. त्यावेळी पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता संबंधित विभागाने आतापासूनच घ्यावी, असे आदेश प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिले. कार्तिकी यात्रेच्या तयारीसाठी प्रशासनाने तयारीसाठी आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी तहसीलदार गजानन गुरव, मुख्याधिकारी शंकर गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश जाधव, गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे, शहर पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, तालुका पोलीस निरीक्षक दिलीप जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज गायकवाड आदी उपस्थित होते. सोलापूर महानगरपालिकेकडे शववाहिकेची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.(प्रतिनिधी) दोन हजार शौचालये ■ नगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिली. यात्रा कालावधीमध्ये दोन हजार शौचालये उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून स्वच्छतेसाठी कमीत कमी पाचशे हंगामी कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडे ५ वैद्यकीय अधिकारी, तीन अँम्ब्युलन्सची मागणी करण्यात आली आहे. पाण्यासाठी अतिरिक्त ३७ टँकरची मागणी करण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी गोरे यांनी सांगितले. |
कार्तिकी यात्रेची तयारी सुरू
By admin | Updated: October 22, 2014 14:39 IST