शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

चित्रकला आणि मुर्तीकलेत जीव ओतणारा सोलापूरचा चित्रकार प्रशांत यमपुरे

By admin | Updated: March 30, 2017 14:16 IST

आॅनलाईन लोकमत सोलापूर दि़ ३०

चित्रकला आणि मुर्तीकलेत जीव ओतणारा सोलापूरचा चित्रकार प्रशांत यमपुरेआप्पासाहेब पाटील - सोलापूरएखाद्याला समोर बसवून काही वेळात त्याचे हुबेहूब चित्र रेखाटणे अन् रेखाटलेले चित्र मूर्तीकलेत साकारणे... म्हणजे चित्रकला अन् मूर्तीकलेचा संगमच म्हणावा लागेल़ कलाकाराला एखादीच कला अवगत असते. प्रशांतने मात्र चित्रकला आणि मूर्तीकला या दोन्ही कला आत्मसात केल्या आहेत़ भारतीय संस्कृतीचे जतनही या अवलिया कलाकाराने आपल्या कुंचल्याने केले आहे़ हा आहे सोलापूरचा उदयोन्मुख कलाकार प्रशांत यमपुरे़ सोलापूर शहरातील विजापूर रोडवरील आनंद नगर येथे राहणारा प्रशांत यमपुरे हा उच्चशिक्षित आहे़ प्रशांतचे प्राथमिक शिक्षण जैन गुरुकुल प्रशाला, बाळीवेस येथे झाले़ त्यानंतर ११ व १२ वीचे शिक्षण कुचन प्रशालेत तर उच्च शिक्षणासाठी तो पुणे स्थायिक झाला़ उच्च शिक्षण घेतल्यामुळे व आरक्षणामुळे प्रशांतला अनेक शासकीय नोकऱ्यांची आॅफर मोठ्या प्रमाणात आल्या होत्या; मात्र चित्रकलेचा छंद आत्मसात केल्याने चित्रकलेतच करिअर करण्याची जिद्द बाळगली़ सुरुवातीला काही वर्षे काहीच पदरात पडत नव्हते़ त्यामुळे या छंदामुळे भविष्य अंधारमय होतेय का असे वाटत असताना जिद्द बाळग़़क़ाहीतरी चांगलं होईल असा धीर देणाऱ्या मित्रांमुळे प्रशांतने चित्रकलेचा ध्यास सोडला नाही़ सुरुवातीला मोडक्या तोडक्या रुपात चित्रे साकारणारा प्रशांत आज मोठ्या चित्रकारांना लाजवेल अशी चित्रे काढतोय़ ---------------------आयकॉन आॅफ इंडियातूनही रेखाटली चित्रेच्कोणता चित्रकार कोणत्या प्रकारची चित्रे काढेल याचा काही नियम नसतो; मात्र चित्रकलेत नवनवीन प्रकार शोधण्यासाठी प्रत्येक चित्रकाराची धडपड असते़ असाच धडपड करणारा चित्रकार प्रशांत यमपुरे यांनी आयकॉन आॅफ इंडियाच्या संकल्पनेतून देशातील दिग्गज लोकांची चित्रे रेखाटण्याचा प्रयत्न करीत आहे़ यात आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योगपती रतनटाटा यांची चित्रे रेखाटलेली आहेत़ पोट्रेट प्रकारातील थ्री डी पोट्रेटमध्ये वाळूचे विविध प्रकार वापरून चित्रे बनविणे प्रशांतची एक वेगळी कला आहे़---------------------प्रदर्शनासाठी परदेशातून बोलावणं़़़च्सोलापूरचा चित्रकार प्रशांत यमपुरे हा भारतीय संस्कृतीचे जतन करण्यात अग्रेसर आहे़ भारतातील बहुसंख्य नागरिक परदेशी स्थायिक झाले आहेत़ त्यामुळे भारतीय चित्रकारांच्या कलेस प्रोत्साहन व त्यांचे कौतुक करण्यासाठी परदेशातील अनेक मंडळी आता प्रशांत यमपुरे यास निमंत्रण देत आहेत़ याच धर्तीवर पुढील महिन्यात हाँगकाँग, सिंगापूर, लंडन आदी ठिकाणी प्रदर्शन होणार आहे़ प्रशांतने यापूर्वी दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बेंगलोर, कोलकात्ता याठिकाणी प्रदर्शन करून सोलापूरची चमकदार कामगिरी दाखवून दिली आहे़--------------------परदेशातील भारतीयांचा तो चाहता़़़़च्भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेल्या भरतनाट्यम, मणिपुरी, कथ्थकली, आदिवासी, बंगाली, महाराष्ट्रीयन वधू यांच्यावरील चित्रे रेखाटणे ही वेगळी कला प्रशांतने आत्मसात केली आहे़ भारतीय संस्कृतीचे जतन, जनजागृती, प्रचार, प्रसार करणारा चित्रकार म्हणूनही त्यांची ओळख संपूर्ण देशभर आता होऊ लागली आहे़ त्यामुळेच मुळात भारतीय असलेले मात्र नोकरीच्या निमित्ताने परदेशी स्थायिक झालेल्या नागरिकांचा तो आता चाहता बनला आहे़ ----------------राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्णच्जिद्द, मेहनत, परिश्रमाने रात्रंदिवस अभ्यास, सराव करीत विविध चित्रकारांची प्रदर्शने पाहून जेडीआर क्षेत्रात टॉप होण्याचे स्वप्न पाहिले होते़ सोलापूरचा चित्रकार प्रशांत यमपुरे याने अभिनव कला महाविद्यालय, पुणे येथे चित्रकलेतील पदवी (जेडीआर) मध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला़ त्यामुळे संपूर्ण राज्यभरात सोलापूरचे नाव चमकले़ -----------------भारतीय संस्कृती खूप सुंदर आहे़ या संस्कृतीचे जतन, प्रचार, प्रसार करण्यासाठी यापुढील काळात काम करणार आहे़ चित्रकलेत वेगळे काही करण्यापेक्षा आपल्या भारतीय संस्कृतीत खूप काही वेगळे आहे तेच करण्याचा प्रयत्न करणार आहे़ - प्रशांत यमपुरे, चित्रकार, सोलापूऱ