शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकास्तरावच होणार प्रभागरचना

By admin | Updated: August 23, 2016 20:26 IST

महापालिकेच्या नव्या निवडणुकीसाठी तयार करण्यात येणाऱ्या प्रभाग रचनेसाठी निवडणूक आयोगातर्फे संगणकीय साफ्टवेअरचा वापर करण्यात येणार होता.

सोलापूर : महापालिकेच्या नव्या निवडणुकीसाठी तयार करण्यात येणाऱ्या प्रभाग रचनेसाठी निवडणूक आयोगातर्फे संगणकीय साफ्टवेअरचा वापर करण्यात येणार होता. पण सॉफ्टवेअरची चाचणी यशस्वी न झाल्याने महापालिका स्तरावरच प्रभाग रचना तयार करण्याची सूचना निवडणूक आयोगाने दिली आहे. मनपा निवडणूक तयारीबाबत निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी राज्यातील महापालिकांच्या अधिकाऱ्यांसमवेत मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सला आयुक्त विजयकुमार काळम, उप आयुक्त श्रीकांत मायकलवार, नगररचना विभागाचे सहायक संचालक महेश क्षीरसागर आदी उपस्थित होते. मतदार जागृती व नवीन मतदार नोंदणीबाबत वॉर्डस्तराव मोहीम घ्या. युवकांचे मतदान शंभर टक्के व्हावे यासाठी प्रयोग व्हावेत. नव्याने करण्यात येणाऱ्या प्रभाग रचनेबाबत निवडणूक आयोगामार्फत साफ्टवेअर पुरविण्यात येणार होते. पण याची चाचणी यशस्वी न झाल्याने महापालिकांकडे उपलब्ध असलेल्या मॅन्युअल रचनेवर नव्या प्रभागांची मांडणी मनपा स्तरावरच करण्यात यावी असे सुचित करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने यापूर्वीच प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानंतर सोमवारी व्होटिंग मशीनच्या सुरक्षेबाबत आदेश काढले आहेत. ४0 पानी अद्यादेशात आयोगाने व्होटिंग मशीन सुरक्षेसाठी राखीव ठेवलेल्या गोदामाबाबत नियमावली दिली आहे. महापालिकेने २३00 ईव्हीएम ठेवण्यासाठी गोदामाची तयारी सुरू केली होती. पण आयोगाने पहिल्या टप्प्यात दीड हजार व दुसऱ्या टप्यात दीड असे तीन हजार इव्हीएम पुरविली जातील असे स्पष्ट केले आहे. ईव्हीएम ठेवण्यासाठी मोठे गोदाम, त्या गोदामाची बाह्य व अंतर्गत सुरक्षा कडक असावी. सीसी कॅमेरे, फायर फायटिंग यंत्रणा आदीबाबत नकाशासह आयोगाला माहिती सादर करण्याबाबत कळविले आहे. त्यामुळे असे गोदाम तयार करण्याबाबत बांधकाम विभागाला पत्र दिल्याची माहिती उप आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिली. प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केल्याने महापालिकेने यापूर्वी दिलेल्या रचनेप्रमाणे तयारी करण्यात येत आहे. ४ वॉर्डाचे २४ व तीन वॉर्डाचे २ प्रभाग होणार आहेत. प्रभागांची रचना कशापद्धतीने करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी मनपा निवडणुकीची तयारी सुरू झाल्याने या विभागात कर्मचारी वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे आयुक्तांकडे अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी केल्याचे उप आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी सांगितले. प्रभाग रचनेची सोडत व इतर प्रक्रिया आॅनलाईन निवडणूक आयोगाला कळवावी लागणार आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे. ईव्हीएमसाठी शासकीय गोदामाची मागणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.