बार्शी : तालुक्यातील आगळगाव येथील महावितरणच्या लघुदाब वाहिनीवरून आकडा टाकून ज्वारीच्या पिकाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून शेतीला कुंपण घालण्यासाठी ८ हजार ६४० रुपयांची विजेची चोरी झाली आहे. कनिष्ठ अभियंता वर्षा धनाजी सोनवणे यांनी शहर पोलिसात याविषयीची तक्रार देताच एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरेगाव येथील नागनाथ देविदास गिराम याने शेतात ज्वारी पेरली आहे. शेतात वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढत असल्याने त्याने ज्वारीच्या संरक्षणासाठी व वन्यप्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी तारेवर आकडा टाकून विजेची चोरी केली. ही चोरी उघड घाल्याने गिराम याला तडजोड आकारणी करूनही त्याचा भरणा केला नाही म्हणून शहर पोलिसात तक्रार दाखल होताच गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे करत आहेत.