शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

करमाळा तालुक्यात पवार गटाची पाॅवर वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:19 IST

आदिनाथ कारखाना आ. रोहित पवारांच्या बारामती अ‍ॅग्रोने भाडेतत्त्वावर २५ वर्षे चालविण्यासाठी घेतल्याचे येथे समजताच तालुक्यातील चिखलठाण, कंदर, वांगी, केडगाव, ...

आदिनाथ कारखाना आ. रोहित पवारांच्या बारामती अ‍ॅग्रोने भाडेतत्त्वावर २५ वर्षे चालविण्यासाठी घेतल्याचे येथे समजताच तालुक्यातील चिखलठाण, कंदर, वांगी, केडगाव, टाकळी, कोंढारचिंचोली, केत्तूर, खातगाव येथील ऊस उत्पादकांनी फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष साजरा केला. आता आमच्या उसाला चांगला भाव मिळेल, अशी भावना सभासदांमधून व्यक्त होऊ लागली आहे. उजनी धरणाच्या हाकेच्या अंतरावर असलेला आदिनाथ कारखान्याच्या १५ किलोमीटर परिसरात लाखो मे. टन उसाची उपलब्धता आहे. असे असताना आदिनाथ कारखाना आर्थिक संकटात सापडला यास स्थानिक नेतृत्व जबाबदार असल्याची भावना कारखान्याच्या ऊस उत्पादकासह सभासदांतून व्यक्त होत आहे.

करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातून बारामती अ‍ॅग्रो व अंबालिका या दोन पवारांच्या साखर कारखान्यास लाखो मे. टन ऊस गाळपासाठी जातो. त्या शेतकऱ्यांना इतर कारखान्यांपेक्षा १०० ते १५० रुपये जास्त भाव मिळतो, असा अनुभव आहे. आदिनाथची भौगोलिक परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांना निश्चित जास्त भाव मिळेल, या आशेने ऊस उत्पादकांतून आनंद व्यक्त केला जात आहे. मात्र, कारखान्यावर राजकारण करणाऱ्या नेत्यांची मात्र निराशा झाली आहे. करमाळा तालुक्याच्या राजकारणात पूर्वीपासून जगताप, बागल, पाटील व नव्याने संजयमामा असे गट कार्यरत असताना आता आदिनाथ चालविण्यास घेतल्याने पवार गटाची पाॅवर वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

कोट :::::::::

कारखान्याच्या १५ कि.मी. परिसरात पाच लाख मे. टन ऊस उपलब्ध असताना कारखान्याचा कारभार पारदर्शी व काटकसरीतून झाला नाही. परिणामी कारखाना आर्थिक संकटात सापडला. यास स्थानिक नेतृत्व जबाबदार आहे. आता अनुभव संपन्न असलेल्या पवारांनी आदिनाथ चालविण्यास घेतल्याने ऊस उत्पादकांना चांगला भाव मिळेल.

- धुळाभाऊ कोकरे,

ऊस उत्पादक, कुगाव

कोट :::::::::::

आदिनाथच्या परिसरात लाखो टन ऊस उपलब्ध असल्याने वाहतूक, उत्पादन खर्च कमी असताना कारखान्यातील कारभाऱ्यांनी हित न पाहिल्याने कारखान्यावर कर्जाचा बोजा कायम राहिला. त्यामुळे ऊस उत्पादकांना समाधानकारक भाव मिळू शकला नाही. कामगारांच्या पगारी थकल्या व चांगला कारखाना तोट्यात आला. बारामती अ‍ॅग्रो चालविण्याचा अनुभव असलेल्या पवारांकडून ऊस उत्पादक व कामगारांना नक्कीच न्याय मिळेल.

- बापूराव देशमुख,

ऊस उत्पादक, वांगी

कोट :::::::::::::::

आदिनाथ व मकाई हे दोन्ही कारखाने सभासदांनी विश्वासाने बागल गटाच्या ताब्यात दिले, पण कारखाने आर्थिक डबघाईला आले. पवारांचे बारामती अ‍ॅग्रो कारखाना इतरांपेक्षा १०० ते १५० रुपये जास्तीचा दर मिळेल. पवारांनी आदिनाथ चालविण्यास घेतल्याने ऊस उत्पादकांना फायदाच होणार आहे.

- आप्पासाहेब झांजुर्णे,

ऊस उत्पादक, रामवाडी.