शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय उलथापालथ : भगीरथ भालकेंनी घेतली तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट

By appasaheb.patil | Updated: June 8, 2023 17:03 IST

सोलापूर :  पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील स्व. आमदार भारत भालके यांचे पुत्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांनी नुकतीच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ...

सोलापूर :  पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील स्व. आमदार भारत भालके यांचे पुत्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांनी नुकतीच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. या भेटीत राजकीय विविध मुद्यावर चर्चा झाली. केसीआर पक्षात प्रवेश करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही, कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे भगीरथ भालके यांनी लोकमत शी बोलताना सांगितले. बैठकीतील अधिक तपशील समजू शकला नाही. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबातील सदस्यही होते.

दरम्यान, केसीआर यांनी भगीरथ भालके यांच्यासाठी पुण्याला खास विमान पाठवले होते. बुधवारी सकाळी ते खास विमानाने सहपरिवार पुण्याहून हैदराबादकडे रवाना झाले होते. बुधवारी सायंकाळी उशिरा त्यांची तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट झाली. त्यानंतर विविध विषयावर चर्चा झाल्यानंतर एकत्रित भोजनही करण्यात आले. त्यानंतर कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांची मते जाणून घेऊन पक्षप्रवेशाबाबतचा निर्णय घेणार असल्याचे भगीरथ भालके यांनी सांगितले.  

स्व. भारत भालकेंच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाने अपेक्षित सहकार्य केले नाही. आर्थिक अडचणीत असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना बाहेर काढण्यासाठी पक्ष नेतृत्वाकडे वारंवार जाऊनही फारशी दखल घेतली नसल्याची खंत भालके यांनी हैदराबादकडे जाताना बोलून दाखविली होती.

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर राव