अक्कलकोट : शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरणाचा प्रारंभ वटवृक्ष मंदिरात समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते झाला. यावेळी स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या मुलांना आणि परिसरातील मुलांना लसीचा लाभ देण्यात आला.
वटवृक्ष मंदिरातील ही लसीकरण मोहीम आठवडाभर चालणार आहे. या उपक्रमासाठी अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचे अंजली खरात, व्ही. कोटनूर, सविता बिराजदार, विजयालक्ष्मी लोहार, पल्लवी जाधव, सुप्रिया नाईक, रेश्मा लोणारे यांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, सागर गोंडाळ, रविराव महिंद्रकर, संतोष जमगे, गिरीश पवार, प्रसाद सोनार उपस्थित होते.
---
फोटो : ३१ अक्कलकोट पोलिओ
पोलिओ लसीकरण प्रारंभप्रसंगी महेश इंगळे.