आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २७ : गुळवंची (ता़ उत्तर सोलापूर) येथील तांड्यावर सोलापूर तालुका पोलीसांनी धाड टाकून ३ लाखांचे दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन नष्ट केले़ याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सोलापूर शहरापासून अवघ्या १० किमी अंतरावर सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुळवंची तांड्यावर बेकायदेशीररित्या हातभट्टी दारू तयार करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती़ त्यानुसार पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांच्या पथकाने गुळवंची तांड्यावर धाड टाकून ५२ बॅरेलमधील १० हजार ४०० लिटर गुळमिश्रित रसायन व इतर मुद्देमाल असा २ लाख ९० हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे़ ही कामगिरी पोलीस अधिक्षक विरेश प्रभू, उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, पोलीस उपनिरीक्षक विकास घुगे यांच्यासह २० पोलीस कर्मचारी उपस्थित होते़ या कारवाईमुळे अवैध धंदे चालकात खळबळ उडाली आहे़
गुळवंची तांड्यावर पोलीसांची रेड, ३ लाखाची दारू रसायन नष्ट, तालुका पोलीसांची कारवाई
By admin | Updated: April 27, 2017 19:19 IST