शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अकलूजमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात

By admin | Updated: May 9, 2014 23:49 IST

अकलूज : माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या भविष्याचा निकाल १६ मे रोजी जाहीर होणार असला तरी, ७ दिवस अगोदरच अकलूजमध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तुल्यबळ असणारे दोन्ही उमेदवार एकाच गावातील असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात दक्षता घेण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संजयकुमार पाटील यांनी दिली.

अकलूज : माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या भविष्याचा निकाल १६ मे रोजी जाहीर होणार असला तरी, ७ दिवस अगोदरच अकलूजमध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तुल्यबळ असणारे दोन्ही उमेदवार एकाच गावातील असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात दक्षता घेण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संजयकुमार पाटील यांनी दिली.येत्या १६ मे ला लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील मतमोजणी होणार असून, या दिवशी अकलूज शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा पोलीसप्रमुख मकरंद रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजयकुमार पाटील यांनी दक्षता घेतली आहे. शहरात आजपासूनच २४ तास नाकाबंदी, वाहन तपासणी, बॅरेगेटींग लावण्यात आले आहेत. प्रत्येकी २० कमांडोंचा सहभाग असणारी दोन दंगानियंत्रक पथके, प्रत्येकी ९ कमांडोंचा सहभाग असणारी २ जलद प्रतिसाद पथके एके ४७ रायफ ल, रिव्हॉल्व्हर व इतर अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह तैनात करण्यात आली आहेत. त्याचबरोबर अकलूज व परिसरातील विविध भागांमध्ये १०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. अकलूज पोलीस ठाण्याकडे असणारा सुमारे ७० पोलिसांचा स्टाफ या बाहेरगावाहून आलेल्या पोलिसांच्या सोबत असणार आहे. शहरात रुट मार्च (ध्वज संचलन) करण्यात येणार आहे. शहरातील संवेदनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात येऊन स्थानिक गुंड, अवैध धंदे, अवैध हत्यारे बाळगणार्‍या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा डॉ. पाटील यांनी दिला.उमेदवारांच्या निकालाच्या दिवसापर्यंतची परिस्थिती पाहून पोलीस बंदोबस्तामध्ये आणखी वाढ करण्यात येणार आहे. या सर्व बंदोबस्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभारी अधिकारी म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह उपविभागीय अधिकारी संजयकुमार पाटील, पो. नि. विश्वास साळोखे, अजय कदम व इतर ५ अधिकारी काम पाहणार आहेत. निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीसप्रमुख मकरंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची मिटींग बोलावण्यात येणार आहे. या मिटींगमध्ये दोन्ही उमेदवारांनाही निमंत्रित केले असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आवर घालावा, फ टाके, डीजे वाजवू नयेत, गुलाल उधळू नये, बॅनर लावू नयेत किंवा परिस्थिती चिघळेल अशी घोषणाबाजी करू नये अशी माहिती त्या मिटींगमध्ये देण्यात येणार आहे. बेकायदा जमाव जमवू नये, विजयी उमेदवाराने मिरवणूक काढू नये अशा सूचनाही देण्यात येणार आहेत. सध्या सोलापूर जिल्‘ात जिल्हाधिकार्‍यांकडून जमावबंदीचा आदेश लागू आहे. त्या आदेशाची कोणीही पायमल्ली करू नये असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी संजयकुमार पाटील यांनी केले आहे.