शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

सोलापुरातील सोनांकुर कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करा ; समाजसेवकांनी केले धरणे आंदोलन

By संताजी शिंदे | Updated: May 2, 2023 17:34 IST

जोपर्यंत सोनांकुर कत्तलखाना बंद होत नाही तोपर्यंत गोप्रेमी तीव्र लढा देत राहतील असा इशारा बिराजदार यांनी दिला.

सोलापूर: अवैद्यरित्या चालत असलेल्या सोनंकुर कत्तलखाना कायमस्वरूपी बंद व्हावा यासाठी समाजसेवक रुद्रप्पा बिराजदार, वैद्य नवनाथ दुधाळ यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पूनम गेट जवळ धरणे आंदोलन करण्यात आले.

 यावेळी प्राणी मित्र विलास शहा, हभप पुष्पलता पाटील,  महेश भंडारी, केतन शहा, गोपाल सोमाणिया, शांतवीर महेंद्रकर, अनिल पाटील, बी. ए. जाधव, देविदास मिटकरी, अक्षय  तोडकरी, विक्रांत बशेट्टी, गणेश घुले, चंद्रप्रभू शहा, सत्यशीला देशमुख, सुनीता बाबर, प्रतिभा एडके, माधुरी डहाळे, बावळे, सुधीर बहिरवडे, डॉक्टर माधुरी पारपल्लीवार व असंख्य पर्यावरण प्रेमी, गोप्रेमी गोरक्षक गोभक्त  यांचा सहभाग होता. 

 सोनंकुर कंपनीच्या कत्तलखान्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा दर तीन महिन्यांनी आढावा घेण्यासाठी व जरूर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी महाराष्ट्र शासन नियुक्त प्राणीक्लेश समिती, कत्तलखाने तपासणी भरारी पथक, महाराष्ट्र शासन नियुक्त उच्च अधिकार समिती महाराष्ट्र प्रदूषण मंडळ मुंबई नियुक्त खास नियुक्त समिती नेमण्यात आली आहे. या तिन्ही समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे आहेत. नियुक्ती पत्रामध्ये निर्देश दिलेल्या एकाही कामाची कार्यवाही प्रशासनाकडून होताना दिसत नाही असे निवेदनात म्हटले आहे. जोपर्यंत सोनांकुर कत्तलखाना बंद होत नाही तोपर्यंत गोप्रेमी तीव्र लढा देत राहतील असा इशारा बिराजदार यांनी दिला.