सोलापूर : भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाच्या धडकेने ५५ वर्षांचा अनोळखी इसम गंभीर जखमी होऊन मरण पावल्याची घटना शनिवारी दुपारी २़३० ते ३ वाजण्याच्या दरम्यान घडली़ याबाबत पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास राठोड यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ दुपारी अनोळखी व्यक्ती सोलापूर मार्केट यार्ड-दहिटणे क्रॉस रोडवरुन जात असताना अयोध्यानगरीजवळ अज्ञात वाहनाची धडक बसली़ या अपघातात पादचाऱ्याच्या डोक्यावरुन, अंगावरुन वाहन गेले़ अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक वाबळे करीत आहेत़
वाहनाच्या धडकेने पादचारी ठार
By admin | Updated: July 13, 2014 01:23 IST