शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

टेम्पो-जीपच्या अपघातात चालकासह पादचारी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:15 IST

सांगोला : भरधाव वेगातील टेम्पो व जीपची समोरासमोर धडक होऊन पिकअप चालकासह पादचारी जागीच ठार झाला तर टेम्पो चालक ...

सांगोला : भरधाव वेगातील टेम्पो व जीपची समोरासमोर धडक होऊन पिकअप चालकासह पादचारी जागीच ठार झाला तर टेम्पो चालक गंभीर जखमी झाला.

रविवारी सकाळी ८:३० च्या सुमारास सांगोला- पंढरपूर रोडवरील फॅबटेक महाविद्यालयाजवळ हा अपघात झाला. या अपघातात लक्ष्‍मण हिंदुराव पवार (३५ रा. लोकरेवाडी, ता. तासगाव, जि. सांगली) आणि चंद्रकांत बबन ढेकळे (रा.पंढरपूर) अशी मरण पावलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार लोकरेवाडीतील लक्ष्मण पवार हे रविवारी त्यांची जीप (एम. एच. १०/ सी.आर. १२३०) सांगोलामार्गे मोडनिंबकडे घेऊन निघाले होते. सांगोल्यापासून पुढे तीन किलोमीटरवर फॅबटेक महाविद्यालयाजवळ आले असता पंढरपूरहून सांगोल्याच्या दिशेने निघालेल्या टेम्पो (एम. एच. २०/ सी.टी. ९१०५) ने जीपला समोरून जोराची धडक दिली. याचवेळी रस्त्यावरुन पायी चालत निघालेल्या चंद्रकांत ढेकळे यांना या वाहनांची धडक बसली आणि ते रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. त्यामुळे डोक्यास गंभीर इजा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. टेम्पो वेगात असल्याने जीप चालक लक्ष्मण पवार व टेम्पो चालक मारुती केंद्रे दोघेही केबिनमध्ये अडकून गंभीर जखमी झाले.

यावेळी गस्तीवर निघालेले सहायक पोलीस निरीक्षक माने, तुकाराम व्हरे, पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत सावंत, होमगार्ड गणेश झाडबुके यांनी अपघात पाहून जखमींच्या मदतीला धावले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघा चालकांना बाहेर काढले, मात्र जीप चालक लक्ष्मण पवार यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. टेम्पो चालक लक्ष्‍मण केंद्रे याच्यावर सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत माणिक भालचंद्र बाबर (रा. मानेगाव, ता. सांगोला) यांनी टेम्पो चालक मारुती केंद्रे याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

-----

फोटो :०४ सांगोला अक्सीडेंट १ आणि २

सांगोला- पंढरपूर रोडवर टेम्पो व जीपची समोरासमोर धडक झाली.