शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
2
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
3
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
4
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
5
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
6
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
7
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
8
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
9
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
10
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
11
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
12
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
13
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
14
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
15
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
16
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
17
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
18
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
19
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
20
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय

सांगोल्यात सलग ४५ वर्षे शेकापचे वर्चस्व

By admin | Updated: January 24, 2017 20:26 IST

सांगोल्यात सलग ४५ वर्षे शेकापचे वर्चस्व

सांगोल्यात सलग ४५ वर्षे शेकापचे वर्चस्वअरुण लिगाडे - सांगोला आॅनलाईन लोकमतपंचायत समितीच्या सन १९६२ स्थापनेपासून सुरुवातीचे काँग्रेसचे दहा वर्षे सभापतीपद वगळता सन १९७२ ते २०१७ असे शेकापचे आ. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सलग ४५ वर्षे पंचायत समितीवर शेतकरी कामगार पक्षाची एकहाती सत्ता अबाधित आहे. पंचायत समितीच्या ५५ वर्षे सुवर्ण महोत्सवाच्या काळात काँग्रेसने २ तर शेकाप पक्षाकडून ४ महिला व ९ पुरुषांना सभापती होण्याचा मान मिळाला आहे. यामध्ये अकोला (ता. सांगोला) येथील शेकापचे ज्येष्ठ नेते कै. जगन्नाथराव लिगाडे हे सलग १८ वर्षे सभापतीपदावर राहिले. त्यानंतर नाझरा येथील कै. वसंतराव पाटील यांना ७ वर्षे सभापतीपदाचा कार्यकाल मिळाला. सांगोला पंचायत समितीची स्थापना सन १९६२ साली झाली. स्थापनेपासून ५५ वर्षांच्या काळात तब्बल १५ सभापती पंचायत समितीस लाभले. मेडशिंगी (ता.सांगोला) येथील काँग्रेसचे कै. संभाजीराव तथा दादासाहेब शेंडे यांना सन १९६२ साली पहिले सभापती होण्याचा मान मिळाला. त्यांनी १९६२ ते १९६९ असे सात वर्षे सभापती म्हणून काम पाहिले. त्यानंतर काँग्रेसचे महादेव भोसले यांनी १९६९ ते १९७२ असे तीन वर्षे सभापतीपदावर राहिले. पंचायत समितीच्या स्थापनेनंतर सलग दहा वर्षे काँग्रेसच्या ताब्यात पंचायत समिती होती. त्याकाळी १९६२ ते १९७२ या कालावधीत शेकापकडून गणपतराव देशमुख हे विधानसभा सदस्य असूनही पंचायत समिती काँग्रेसच्या ताब्यात होती. त्यानंतर मात्र, सन १९७२ ते २०१७ आजतागायत सांगोला पंचायत समितीवर आ. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सलग ४५ वर्षे शेकापचे वर्चस्व राहिले आहे़ ---------------------------यांना मिळाली सभापती पदाची संधीआ. डॉ. देशमुख यांनी पक्षातील निवडून येणाऱ्या सदस्यांना आरक्षणनिहाय सभापतीची संधी दिली आहे. यामध्ये सन १९९७-१९९८ कुसुम चौगुले, १९९८-१९९९ रंभाजी पाटील, १९९९-२००० भारती कांबळे, २००१ -२००२ राहुल काटे, २००२-२००५ विलास काशीद, २००५-२००७ बाळासाहेब काटकर, २००७-२००९ संभाजी आलदर, २००९-२०१२ बाळासाहेब काटकर, २०१२-२०१४ ताई मिसाळ, २०१४-२०१७ सुरेखा सूर्यगण यांना सभापती होण्याचा मान मिळाला आहे़------------------------पुन्हा महिलाराज़़़४येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीत सभापतीपदाचे आरक्षण ओबीसी महिलेसाठी जाहीर झाले आहे. २०१२-२०१७ या पाच वर्षांच्या कालावधीत आरक्षणानुसार अडीच-अडीच वर्षे दोन महिलांना सभापतीपदाची संधी मिळाली आहे तर सन २०१७ च्या निवडणुकीनंतर अडीच वर्षे सभापतीपद महिलेकडे राहणार असल्याने सलग साडेसात वर्षे सांगोला पंचायत समितीवर महिलांचे वर्चस्व असणार आहे. ----------------------------पुरुषांबरोबर महिलांना संधीपूर्वी निवडणूक आयोग नसल्यामुळे मंत्रिमंडळ सभापतीपदाचा कार्यकाल ठरवून देत होते. त्याकाळी सभापतीपदाचा कार्यकाळ ५ वर्षे राहिल्यामुळे कै. जगन्नाथराव लिगाडे हे १८ वर्षे पदावर राहिले. आता निवडणूक आयोग व आरक्षणानुसार महिलांनाही राजकारणात ५० टक्के आरक्षण असल्याने सभापतीपदाचा कार्यकाल अडीच अडीच वर्षे आहे. त्यामुळे पुरुषांच्या बरोबरीने पंचायत समितीमध्ये महिलांनाही सेवा करण्याची संधी मिळत आहे.