शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

 देयके भरा अन्यथा वीजपुरवठा खंडित, महावितरणचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 15:13 IST

सोलापूर दि २५  : वारंवार आवाहन करूनही वीजबिल न भरणाºया थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई महावितरणने सुरू केली असून घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे किती रक्कम थकलेली आहे हे न पाहता नियमांच्या अधीन राहून वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.

ठळक मुद्देनियमांच्या अधीन राहून वीजपुरवठा खंडित२ लाख ६१ हजार ५६० वीजग्राहकांकडे ३८ कोटी ७९ लाख रुपयांची थकबाकी थकबाकीदार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई सुरू

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २५  : वारंवार आवाहन करूनही वीजबिल न भरणाºया थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई महावितरणने सुरू केली असून घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे किती रक्कम थकलेली आहे हे न पाहता नियमांच्या अधीन राहून वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.    जिल्ह्यात सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्यिक तसेच औद्योगिक वर्गवारीतील २ लाख ६१ हजार ५६० वीजग्राहकांकडे ३८ कोटी ७९ लाख रुपयांची थकबाकी आहे. यात २ लाख ३४ हजार ६७६ घरगुती ग्राहकांकडे २८ कोटी ७३ लाख, वाणिज्यिक २३ हजार ६०७ ग्राहकांकडे ७ कोटी ६४ लाख तर ३ हजार २७७ औद्योगिक ग्राहकांकडे २ कोटी ४२ लाख रुपयांची थकबाकी आहे. दिलेल्या मुदतीत वीजबिलांचा भरणा न केल्याने थकबाकीचे प्रमाण वाढत असल्याने या थकबाकीदार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील ३ लाख ४४ हजार ५०० कृषिपंपधारकांकडे वीजबिलांची २ हजार ३६२ कोटी ४ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यांनाही वीजबिल भरण्याची विनंती महावितरणकडून करण्यात येत आहे. याशिवाय सार्वजनिक पाणीपुरवठा वर्गवारीतील १ हजार ७३८ वीजग्राहकांकडे ३४ कोटी ४२ लाखांची थकबाकी आहे.    जिल्ह्यात थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची ही मोहीम तीव्र करण्यात आली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर थकीत वीजबिलांचा भरणा करणे, संबंधित कार्यालयात पावती दाखवून, रिकनेक्शन चार्जेस भरून वीजपुरवठा सुरु करून घ्यावा लागत आहे. महावितरणच्या संबंधित कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाºयांसह वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांची विशेष पथके या मोहिमेत सहभागी झालेले आहेत. याशिवाय तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.     चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबील भरणा केंद्रांसह महावितरणची वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपद्वारे 'आॅनलाईन' सोय उपलब्ध आहे. ग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी चालू देयकांचा मुदतीत व मागील महिन्यांतील थकबाकीचा त्वरित भरणा करावा आणि वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई नाईलाजास्तव करण्यास भाग पाडू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.