या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सरपंच गणेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषिराज शुगरचे संचालक शेखर पाटील, शहाजीराव पाटील, द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक धैर्यशील पाटील, यशवंत पाटील, ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन जयवंत गावंधरे, सोसायटीचे सचिव सुनील तळेकर, विश्वनाथ भिंगारे उपस्थित होते. बजाज रक्तपेढी आणि रेवनील ब्लड बँक, सांगोला यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमासाठी उपसरपंच भारत जमदाडे, ग्रामपंचायत सदस्य नामदेव कोरके, संतोष काकडे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णात माळी, संतोष कोरके, नवनाथ तळेकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, भोसे ग्रामस्थ उपस्थित होते.
..............
फोटो ओळी : भोसे येथे (ता. पंढरपूर) स्व. राजूबापू पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराप्रसंगी गणेश पाटील, शेखर पाटील, शहाजीराव पाटील, धैर्यशील पाटील आदी.
.............
(फोटो ३१ भोसे राजूबापू पाटील)