शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

आता ३० एप्रिलपर्यंत पांडुरंगाचे दर्शन होणे नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:20 IST

सध्या वाढत असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व धार्मिक व प्रार्थनास्थळे सोमवारपासून ( ५ एप्रिल) ३० ...

सध्या वाढत असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व धार्मिक व प्रार्थनास्थळे सोमवारपासून ( ५ एप्रिल) ३० एप्रिलच्या रात्री ११.५९ पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. यामुळे श्री विठ्ठलाचे दर्शन भाविकांसाठी ५ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत बंद असणार आहे. यामुळे भाविकांना पुढील २५ दिवस विठ्ठलाचे दर्शन घेता येणार नाही.

सुरुवातीच्या कालावधीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता १७ मार्च २०२० ते १४ नोव्हेंबर २०२० या कालावधीत भाविकांना विठ्ठलचे दर्शन बंद ठेवण्यात आले होते.

त्यानंतर राज्य शासनाच्या आदेशानुसार १५ नोव्हेंबर २०२० पासून भाविकांना विठ्ठलाचे मुखदर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे. पुन्हा राज्य शासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने श्री विठ्ठल- रूक्मिणी मंदिर व मंदिर समितीच्या अधिपत्याखालील पंढरपूर शहर व परिसरातील २८ परिवार देवतांची मंदिरे ५ ते ३० एप्रिल या कालवधीत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येत आहेत.

मंदिरात सर्व नित्योपचार परंपरेनुसार सुरू राहतील. त्तसेच इतर सणवार, उत्सव परंपरेनुसार साध्या पध्दतीने साजरे करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला असल्याचे पत्रक सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, सदस्य आ. रामचंद्र कदम, शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, संभाजी शिंदे, आ. सुजितसिंह ठाकूर, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख, ॲड. माधवी निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे, ह.भ.प.शिवाजीराव मोरे, साधना भोसले यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

----