शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

माघी एकादशीनिमित्त पंढरी दुमदुमली

By admin | Updated: February 7, 2017 16:18 IST

माघ एकादशीनिमित्त सावळ्या विठूरायांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी पंढरी दुमदुमून गेली आहे.

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ७ -  माघ एकादशीनिमित्त सावळ्या विठूरायांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी पंढरी दुमदुमून गेली आहे. पहाटेपासून विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे़  
विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीमार्फत  माघी एकादशी निमित्त प्रांताधिकारी तथा मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी डॉ.विजय देशमुख यांच्या हस्ते सपत्निक श्री विठ्ठलाची नित्यपूजा करण्यात आली. तर रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदिर समितीचे व्यवस्थापक तथा नायब तहसिलदार विलास महाजन यांच्या हस्ते करण्यात आली.
माघी एकादशीच्या नित्यपूजेस जिल्हाधिकारी तथा मंदीर समितीचे सभापती रणजीतकुमार, सहाय्यक पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अतुल कुलकर्णी, शहर पोलिस निरिक्षक विठ्ठल दबडे यांच्यासह मंदीर समितीचे अधिकारी-कर्मचारी  उपस्थित होते. 
पंढरपुरात येणारा भाविक चंद्रभागा नदीत स्नान करून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी दर्शनरांगेकडे जात आहेत. दर्शनरांगेत सहभागी होऊन अतिशय शांततेने विठूमाऊलीचा आणि ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष करीत पददर्शनासाठी हळूहळू पावले टाकत पुढेपुढे सरकत आहेत़
सकाळपासूनच मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट, स्टेशन रस्ता, चौक ही ठिकाणांवरून वारकरी दर्शनासाठी मंदिर मार्गावर गर्दी केली आहे़ संत गजानन महाराज मठ, संत तनपुरे महाराज मठ, संत कैकाडी महाराज मठ यासह अन्य मठातही भाविकांनी मोठी गर्दी केली आहे़ मठ, धर्मशाळा, आश्रमशाळेत भजन, प्रवचन, किर्तनाचे सूर अजुनही आळवले जात आहेत़ एकूनच पंढरपूरात माघवारीनिमित्त पंढरी भक्तीमय झाली आहे़ काही वारकरी दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर लागली आहेत़ यात्रेमुळे एसटी विभागानेही जादा गाड्यांचे नियोजन केले आहे.
 
जिल्हा प्रशासनाचे ग्रेट वर्क
माघवारीनिमित्त पंढरपूरात येणाºया भाविकांचे हाल होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्या मार्गदर्शनाखालील टिमने नेटके नियोजन केले. दर्शन रांगेत गर्दी होणार याची पूर्णपणे काळजी घेतली आहे. यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधिक्षक एस़ विरेश प्रभू याच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.कोणत्याही वारक-यांची गैरसोय होणार नाही याबाबत जिल्हा प्रशासन व ग्रामीण पोलीस प्रशासन काम करीत आहे.