शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूरचा भूगर्भातील पाणीसाठा खालावत आहे... बोअर घेऊन सुध्दा लागेना पाणी

By रेवणसिद्ध जवळेकर | Updated: March 25, 2023 17:52 IST

या उलट ग्रामीण भागात कमी खोलीवर बोअरला तत्काळ पाणी लागल्याचे दिसून येत आहे.

पंढरपूर : शहरात अनेक ठिकाणी बोरवेल घेतली मात्र पाणी मिळून आले नाही अशा घटना निदर्शनास येत आहेत. तर या उलट ग्रामीण भागात कमी खोलीवर बोअरला तत्काळ पाणी लागल्याचे दिसून येत आहे.

पंढरपूर शहर झपाट्याने विकसित होत आहेत. शहरात मोठ्या इमारती उभारले जात आहेत. तसेच भुयारी गटार योजना राबवले जात आहेत. यामुळे शहरात पाण्याचा जास्त वापर, शहरीकरणामुळे पावसाचे पाणी जमिनीत झिरपण्याचे प्रमाण हे गेल्या काही वर्षांत कमी झाले आहे. तसेच बेसुमार वृक्षतोडीमुळे सुद्धा जमिनीत पाणी झिरपण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. 

या सर्वांचा परिणाम म्हणजे भूजल पातळी खूप झपाट्याने खालावत चालली आहे. परिणामी शहरात अनेक भागात बोअर घेतल्यास पाणी न मिळाल्याचे आढळून येत आहे. तसेच ३०० ते ४०० फूट खोल बोर करून ही पाणी लागत नाही. शहरात एकाच जमीन मालकाला दोन वेळा बोर घ्यावी लागत आहे. यासाठी विनाकारण होणारा आर्थिक खर्च त्यांना सहन करावा लागत आहे.पूर्वी शंभर टक्के एक ते दीड इंच पाणी लागत होते. आता शंभर टक्के पाणी लागेलच याची खात्री देता येत नाही. पाण्याचा उपसा खूप वाढला आहे, ही गोष्ट चिंताजनक आहे.

यामुळे पावसाळ्यातील व रोज निर्माण होणारे सांडपाणी नागरिकांनी घराच्या परिसरात जिरवणे गरजेचे आहे. तसेच छतावरील पावसाचा प्रत्येक थेंबही भूजलाची पातळी वाढवण्यास वापरला पाहिजे. पावसामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली जाते. यामुळे राहत असलेल्या परिसरात पाणी जिरवणे गरजेचे आहे.