शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेते विजय गोखले यांना पद्माकर देव स्मृती पुरस्कार; अकरा हजार रोख, स्मृतीचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप

By रवींद्र देशमुख | Updated: February 15, 2024 18:49 IST

हा पुरस्कार सोहळा प्रसिद्ध उद्योगपती किशोर चंडक यांच्या हस्ते तसेच उद्योजिका सुहासिनी शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

रवींद्र देशमुख

सोलापूर: श्रुती मंदिर नाट्यसंस्थेचे संस्थापक कै.पद्माकर देव यांच्या नावे देण्यात येणारा देव स्मृती पुरस्कार ज्येष्ठ नाट्य आणि सिनेकलावंत, प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा प्रसिद्ध उद्योगपती किशोर चंडक यांच्या हस्ते तसेच उद्योजिका सुहासिनी शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

पुरस्काराचे स्वरूप शाल,श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि अकरा हजार रुपये रोख असे आहे. पुरस्काराचे हे बारावे वर्ष असून श्रुती मंदिर या संस्थेचा हिरक महोत्सवी वर्षात हा पुरस्कार जाहीर करताना जेष्ठ विधिज्ञ जे.जे. कुलकर्णी, कार्यवाह प्रा. विद्या काळे, हिरक महोत्सवी वर्षाच्या स्वागताध्यक्ष डॉ.माधवी रायते हे उपस्थित होते. विजय गोखले यांची ४०-४५ वर्षांची कारकीर्द विचारात घेता, तसेच विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून, त्यांच्या सुपुत्राकडून नाट्य विषयक अनुभव आणि विद्याधर गोखले यांच्या विषयी आठवणी या कार्यक्रमात ऐकायला मिळणार आहेत.शनिवारी वितरण

 हा समारंभ शनिवारी दिनांक १७ फेब्रुवारी रोजी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात सायं सहा वाजता आयोजित केला आहे.  या कार्यक्रमाला सर्व नाट्य कलावंत, रसिक आणि श्रुती मंदिर चे हितचिंतक यांनी आवर्जून उपस्थित रहावे,असे आवाहन हिरक महोत्सवी वर्षाचे कार्यवाह अमोल धाबळे यांनी केले आहे.