शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील साखर कारखाने उभारणार ऑक्सिजन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:23 IST

श्रीपूर (जि. सोलापूर) : साखर कारखान्यातील सहवीजनिर्मिती व आसवनी या प्रकल्पांमधून मेडिकल ऑक्सिजननिर्मिती करता येईल, असे वसंतदादा शुगर ...

श्रीपूर (जि. सोलापूर) : साखर कारखान्यातील सहवीजनिर्मिती व आसवनी या प्रकल्पांमधून मेडिकल ऑक्सिजननिर्मिती करता येईल, असे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यानुसार सर्व कारखान्यांना ऑक्सिजननिर्मिती व पुरवठा करण्याबाबत परिपत्रक काढण्यात आल्याची माहिती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर ऑफ जनरल शिवाजीराव देशमुख यांनी दिली.

सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे. यापूर्वी बहुतांश आपत्कालीन परिस्थितीत साखर कारखान्यांनी मदत केली आहे. सद्य:स्थिती लक्षात घेता संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी असे निर्देशित केले आहे की, ज्या कारखान्यांचा गळीत हंगाम अद्याप चालू आहे आणि ज्यांचा सहवीजनिर्मिती व आसावनी प्रकल्प कार्यरत आहे, अशा प्रकल्पांमध्ये मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती करावी व ज्या कारखान्याचा गाळप हंगाम संपलेला आहे, अशा कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षमतेसाठी ऑक्सिजन किटचा पुरवठा रुग्णांना अथवा कोविड सेंटरला करावा. सध्या कोरोना परिस्थिती ही भयानक असून, रुग्णांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज भासत आहे. राज्य शासन व केंद्र शासन ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तथापि, सर्व साखर कारखान्यांनी पुढाकार घेऊन ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

---

साखर कारखान्यांना कसा बनविता येईल ऑक्सिजन

साखर कारखान्यांच्या आसवनी प्रकल्पामध्ये इथेनॉल शुद्ध करण्याचा आणि कार्बन डायऑक्साइड वेगळा करण्याचा अनुभव आहे. त्याकरिता फक्त ऑक्सिजन वेगळा करण्याचा प्रकल्प उभारायचा आहे. ऑक्सिजननिर्मितीचा प्रकल्प उभा करायचा झाल्यास त्यासाठी वाफ व विजेची गरज भासते. यासंदर्भात व्हॅक्युम प्रेशर स्विंग ॲडसॉर्पशन प्रोसेसिंग या प्रकल्पानुसार कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट उभारावेत. यासाठी कारखान्यांनी सध्याची साधनसामग्री व मनुष्यबळाचा वापर करता येईल. त्यामुळे प्रकल्पाचा खर्चसुद्धा कमी होईल, असे शिवाजीराव देशमुख यांनी सांगितले.