शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा स्वबळावर रिपब्लिकन पक्षांची भूमिका, बसपाकडे ४५ अर्ज दाखल

By admin | Updated: January 24, 2017 19:47 IST

अन्यथा स्वबळावर रिपब्लिकन पक्षांची भूमिका, बसपाकडे ४५ अर्ज दाखल

अन्यथा स्वबळावर रिपब्लिकन पक्षांची भूमिका, बसपाकडे ४५ अर्ज दाखल

संताजी शिंदे - सोलापूर

सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या विविध गटांनी सध्या जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रत्येक पक्षाने भारतीय जनता पक्ष, काँग्रेस पक्ष, एमआयएमसारख्या पक्षांशी युती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. झाली तर आघाडी; अन्यथा स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारीही या पक्षांनी ठेवली आहे. बहुजन समाज पार्टी स्वबळावर निवडणूक लढविणार असून ४५ इच्छुकांचे अर्ज पक्षाकडे प्राप्त झाले आहेत. महानगरपालिकेची निवडणूक जशी जवळ येत आहे, तशा पक्षपातळीवर हालचाली वाढल्या आहेत. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) पक्षाकडे सध्या १३ इच्छुकांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. देशापातळीवर भारतीय जनता पक्षासोबत रिपाइं (आठवले) यांची युती झाली आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीतही रिपाइंची युती असणार आहे. याबाबत प्रदेश सरचिटणीस राजा सरवदे यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख व शहर अध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी व सरचिटणीस विक्रम देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे १३ जागांची मागणी केली आहे. पालकमंत्र्यांनी चर्चा करून दोन दिवसांत कळविणार असल्याचे सांगितले. आघाडी झाली तर उत्तम आहे; अन्यथा स्वबळावर निवडणूक लढविण्याचे आदेश केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिले आहेत. दि. २२ जानेवारी रोजी इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (गवई) ने निवडणुकीत २५ जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पक्षाकडे १६ अर्ज दाखल झाले असून, अन्य उमेदवारांशी चर्चा सुरू आहे. प्रभाग क्र. १२, १९ आणि २२ मध्ये इच्छुकांचे १२ अर्ज प्राप्त झाले आहेत. पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने काँग्रेस पक्षाशी वाटाघाटी सुरू आहेत. दोन दिवसांत पार्लमेंटरी बोर्डाची रचना होईल. पक्षाकडे १५ इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. निवडणुकीबाबत पक्षश्रेष्ठींचे पत्र गुरुवारी प्राप्त होणार असून, पुढील भूमिका ठरवली जाईल. आघाडी झाली तर ठीक; अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी प्रदेश उपाध्यक्ष राजा इंगळे यांनी ठेवली आहे. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (पी.जी.) कडे १३ इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. पक्षाची पहिलीच महानगरपालिका निवडणूक असून आघाडीबाबत एम.आय.एम.सोबत बोलणी सुरू आहे. आघाडी झाली तर एस.सी.च्या जागा काही खुल्या वर्गातील तर काही ओबीसीच्या मिळून १३ जागा सोडण्याची मागणी केली आहे. पक्ष स्वत:च्या चिन्हावरच निवडणूक लढविणार आहे. प्रदेशाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्याशी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनी संपर्क साधून उमेदवारीबाबत इच्छा व्यक्त केली आहे. दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल. दरम्यान रिपाइं पी. जी. ग्रुप आणि एमआयएमच्या वतीने शुक्रवारपासून त्यांच्याकडे इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही पक्षाचे प्रमुख प्रमोद गायकवाड व तौफिक शेख यांनी काही इच्छुकांच्या शुक्रवारी मुलाखतीही घेतल्या. -------------------------------------

केंद्रात आणि राज्यात भाजप-सेनेची युती पाहता बहुतांश पक्षांनी आघाडीबाबत वाटाघाटी करण्यास सुरुवात केली आहे. सोलापूरमध्ये पहिल्यांदाच काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आली आहे. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी एकमेकांमध्ये आघाडी सुरू असताना दुसरीकडे बहुजन समाज पार्टीने नेहमीप्रमाणे एकला चलो रे... ही भूमिका कायम ठेवली आहे. पक्षाचे ४५ उमेदवारांनी अर्ज नेले असून यात मराठा, चर्मकार, मोची, बौद्ध, गुरव, मुस्लीम, मातंग समाजाचा समवेश आहे. दि. १९ जानेवारी रोजी ८0 उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या.  दरम्यान दुसऱ्या टप्यातील उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. इच्छुकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असून जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब लोकरे यांच्याशी काही उमेदवार संपर्कात आहेत.