शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

सिध्देश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडकामाला उच्च न्यायालयाची स्थगिती, जिल्हाधिकाºयांना दिले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 11:03 IST

कुमठे येथील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याने को जनरेशन प्रकल्पासाठी बेकायदेशीरपणे उभ्या केलेल्या चिमणीचे पाडकाम पुढील आदेश होईपर्यंत करू नये असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. एस. एस. केमकर व जी. एस. कुलकर्णी यांनी शुक्रवारी शासन व जिल्हाधिकाºयांना दिले. 

ठळक मुद्दे विमानतळास अडसर ठरणारी सिद्धेश्वर को जनरेशन प्रकल्पाची चिमणी पाडकामाचे आदेश शासनाने दिले होतेऊस उत्पादक शेतकºयांवर परिणाम होईल असे निदर्शनाला आणले होते१६ रोजी मंत्रालयात बैठकमुख्यमंत्र्यांकडूनही ‘चिमणी’ला स्थगिती

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ११ : कुमठे येथील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याने को जनरेशन प्रकल्पासाठी बेकायदेशीरपणे उभ्या केलेल्या चिमणीचे पाडकाम पुढील आदेश होईपर्यंत करू नये असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. एस. एस. केमकर व जी. एस. कुलकर्णी यांनी शुक्रवारी शासन व जिल्हाधिकाºयांना दिले.  विमानतळास अडसर ठरणारी सिद्धेश्वर को जनरेशन प्रकल्पाची चिमणी पाडकामाचे आदेश शासनाने दिले होते.  ११ आॅगस्ट रोजी मनपाचे पथक पाडकामासाठी कारखानास्थळावर गेल्यावर शेतकरी सभासदांनी विरोध केला. त्यावर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कारखानास्थळावर येऊन कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांच्याकडून हमीपत्र घेतल्यावर तीन महिन्यांसाठी ही कारवाई स्थगित करण्यात आली होती.  हमीपत्राची मुदत ११ नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे पाडकामाबाबत मनपा प्रशासनाकडून पुन्हा तयारी सुरू झाली होती. या दरम्यान जिल्हाधिकाºयांनी ६ एप्रिल २0१७ व १५ मार्च २0१७ रोजी चिमणी पाडकामासंदर्भात काढलेल्या आदेशाला कारखान्यातील कामगार युनियनचे सचिव अशोक बिराजदार यांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले होते. कारखान्याची चिमणी पाडली तर कारखान्याचे कामगार व ऊसतोड कामगार, ऊस उत्पादक शेतकºयांवर परिणाम होईल असे निदर्शनाला आणले होते. यावर सुनावणी होऊन न्यायालयाने पाडकामास स्थगिती दिली. यात युनियनतर्फे अ‍ॅड. विनीत नाईक यांनी काम पाहिले. ------------------१६ रोजी मंत्रालयात बैठकसिद्धेश्वर कारखान्याची चिमणी हटविण्याबाबत शासनाचे कक्ष अधिकारी मिलिंद हरदास यांनी १६ नोव्हेंबर रोजी मंत्रालयात दुपारी साडेतीन वाजता विमानचालनचे प्रधान सचिवांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केल्याचे जिल्हाधिकाºयांना कळविले आहे.  -------------------मुख्यमंत्र्यांकडूनही ‘चिमणी’ला स्थगितीश्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणी पाडकामाला राज्य शासनाने चार महिन्यांची स्थगिती दिली आहे, अशी माहिती महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चिमणी पाडकामाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. सध्या कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. अशावेळी चिमणी पाडली तर त्याचा गाळपावर परिणाम होईल आणि शेतकºयांचे मोठे नुकसान होणार आहे, अशा आशयाचे निवेदनही त्यांना दिले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय दिला. नवीन चिमणी बांधण्याचे काम होईपर्यंत जुनी चिमणी पाडण्यात येणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. चिमणी अन्य जागी स्थलांतर करण्याबाबत योग्य ती प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे महापौरांनी सांगितले.