शहरं
Join us  
Trending Stories
1
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
2
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
3
"भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
4
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
5
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
7
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
8
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
9
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
10
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
11
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
12
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
13
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
15
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
16
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
17
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
18
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
19
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
20
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न

्रंपंढरपूर पंचायत समितीत केवळ तीनच महिलांना मिळाली सभापतीची संधी

By admin | Updated: January 24, 2017 20:09 IST

्रंपंढरपूर पंचायत समितीत केवळ तीनच महिलांना मिळाली सभापतीची संधी

्रंपंढरपूर पंचायत समितीत केवळ तीनच महिलांना मिळाली सभापतीची संधीपंढरपूर - पंढरपूर पंचायत समितीच्या स्थापनेपासून ५५ वर्षांच्या कालावधीत केवळ तीन महिलांना सभापतीपदाची संधी मिळाली आहे, तर आतापर्यंत केवळ दोन महिलांना उपसभापतीपदाची धुरा सांभाळता आली़१९६२ साली स्थापन झालेल्या पंढरपूर पंचायत समितीचे पहिले सभापती होण्याचा मान स्वातंत्र्यसेनानी बाबुराव विठोजी बागल यांना मिळाला होता़ त्यानंतर मात्र तब्बल ३७ वर्षांनी म्हणजेच १४ मार्च १९९९ साली पहिल्या महिला सभापतीचा मान सुरेखा दिलीप गुरव यांना मिळाला़ सुरेखा गुरव यांनी १३ मार्च २००२ पर्यंत सभापतीपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली़ त्यांच्या कार्यकाळातच मंगल सुखदेव शिंदे याही पहिल्या उपसभापती म्हणून कार्यभार सांभाळला़ एकाचवेळी तेही प्रथमच महिलांना सभापती व उपसभापतीची संधी मिळाली़ हा खरोखरच पंढरपूर पंचायत समितीच्या इतिहासातील अभिमानाची बाब होती़दुसऱ्या महिला सभापती होण्याचा मान १४ मार्च २०१२ साली पुष्पा माणिक जाधव यांना मिळाला़ त्यांनी १४ नोव्हेंबर २०१४ पर्यंत सभापतीपदाची जबाबदारी चोखपणे सांभाळली़ त्यानंतर आता वर्षाराणी माणिक बनसोडे या सभापतीपदाची धुरा सांभाळत आहेत़ या दोघींच्या कार्यकाळात विष्णू बागल हे उपसभापती म्हणून कार्यभार सांभाळत आहेत़वामनराव माने हे सभापती असताना १० फेब्रुवारी २००५ साली प्रेमलता पुरुषोत्तम पवार यांना उपसभापतीपदाची संधी मिळाली़ अशा प्रकारे पंचायत समितीच्या ५५ वर्षांच्या कालावधीत केवळ तीनच महिलांना सभापतीपदाची तर दोन महिलांना उपसभापतीपदाची संधी मिळाली आहे़--------------------------पाच वर्षांत दोन महिलांना संधीपंढरपूर पंचायत समितीच्या ५५ वर्षांच्या वाटचालीत केवळ तीन महिलांना सभापतीपदाची संधी मिळाली आहे़ त्यातील एकाही महिला सभापतीला पाच वर्षांचा पूर्ण कार्यकाळ मिळाला नाही़ सुरेखा गुरव यांना तीन वर्षांचा कालावधी मिळाला तर २०१२ ते २०१७ या पाच वर्षांच्या कालावधीत पुष्पा जाधव व वर्षाराणी बनसोडे यांना अडीच-अडीच वर्षे सभापती म्हणून संधी मिळाली़