शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील १०३ गावांतील आॅनलाईन उतारे बिनचूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 14:11 IST

सोलापूर दि २३ : जिल्ह्यातील ११४४ गावांपैकी १०३ गावांतील आॅनलाईन उतारे दुरूस्तीचे काम पूर्ण झाले आहे. ४५१ गावांतील रेकॉर्ड तलाठ्यांनी तपासून मंडल अधिकाºयांकडे पाठविले आहेत. तर ११२ गावांतील रेकॉर्ड दुरूस्तीचे अहवाल मंडल अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार यांच्याकडे तपासणी पाठविण्यात आले आहेत.

ठळक मुद्देव्हेंडिंग मशीनचा वापर अद्याप कमीच आॅनलाईन उतारे दुरूस्तीची टक्केवारी नऊ आहे४५१ गावांतील रेकॉर्ड तलाठ्यांनी तपासून मंडल अधिकाºयांकडे पाठविले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : जिल्ह्यातील ११४४ गावांपैकी १०३ गावांतील आॅनलाईन उतारे दुरूस्तीचे काम पूर्ण झाले आहे. ४५१ गावांतील रेकॉर्ड तलाठ्यांनी तपासून मंडल अधिकाºयांकडे पाठविले आहेत. तर ११२ गावांतील रेकॉर्ड दुरूस्तीचे अहवाल मंडल अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार यांच्याकडे तपासणी पाठविण्यात आले आहेत.आॅनलाईन उताºयात आणि तलाठ्याकडे असलेल्या दप्तरातील नोंदींमध्ये तफावत आढळून आल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे या दोन्ही ठिकाणांच्या नोंदी तपासून अशा रेकॉर्डचे पुनर्संपादन करण्याची मोहीम महसूल विभागाने हाती घेतली आहे. त्यानुसार पहिला टप्पा १५ आॅगस्टचा ठरविण्यात आला होता. या काळात १०० गावांचे उद्दिष्ट होते. १५ आॅगस्टपर्यंत ७४ गावांमधील रेकॉर्डची आॅनलाईन दुरूस्ती करण्यात आली होती. आता या गावांची संख्या १०३ झाली आहे. एकूण गावांच्या प्रमाणात आॅनलाईन उतारे दुरूस्तीची टक्केवारी नऊ आहे. अक्कलकोट, मोहोळ, माढा, दक्षिण सोलापूर या तालुक्यातील रेकॉर्ड दुरूस्ती झालेल्या गावांची संख्या अन्य गावांच्या तुलनेत अधिक आहे.------------------------व्हेंडिंग मशीनचा वापर अद्याप कमीच शेतकºयांना तत्काळ ७-१२ मिळावा यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील नागरिकांसाठी ७-१२ व्हेंडिंग मशीन सोलापुरातील सेतू केंद्रावर लावण्यात आली आहे. २० रुपयांची नोट टाकल्यावर त्यातून ७-१२ बाहेर पडतो. १५ आॅगस्टला या मशीनचे उद्घाटन झाले. मात्र शेतकºयांचा अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद नसल्याची माहिती आहे. येथून किती शेतकºयांनी ७-१२ घेतला याची नोंद नसली तरी प्रतिसाद कमी असल्याचे सेतू कार्यालयाचे मत आहे.