तात्यासो निवृत्ती लोखंडे असे जखमी पतीचे नाव असून बाळू सदाशिव लोखंडे, भारत सदाशिव लोखंडे, आकाश बाळू लोखंडे, पिल्या बाळू लोखंडे (रा. यलमार-मंगेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तात्यासो निवृत्ती लोखंडे हे ऊसतोडीच्या वाहनावर निपाणी येथे कामाला असून गावात निवडणूक असल्याने मतदानासाठी गावी आले होते. पत्नीने पतीला तुमचा चुलत भाऊ बाळू लोखंडे हा माझ्याकडे वाईट नजरेने बघत असून मागेपुढे फिरतो, विनाकारण घराचे दार वाजवितो, घरापुढे दुचाकीवरून चकरा मारत असल्याचे सांगितले. याबाबत तात्यासोने चुलत भाऊ बाळू व चुलत्यांना विचारणा केली. यावेळी बाळूचा भाऊ भारत याने कानाखाली मारली, तर बाळू लोखंडे, भारत लोखंडे, आकाश लोखंडे, पिल्या लोखंडे यांनी डाळिंबाच्या लाकडाने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
चौघांच्या मारहाणीत एकजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:20 IST