शहरं
Join us  
Trending Stories
1
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
2
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
3
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
4
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
5
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
6
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
7
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
8
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
9
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
10
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
11
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
12
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
13
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
14
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
15
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
16
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
17
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
18
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
20
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?

बोलेरो-मोटारसायकल अपघातात एक ठार

By admin | Updated: March 20, 2015 00:50 IST

मृतक सोलापूर जिल्ह्यातील.

चोरपांग्रा (जि. बुलडाणा) : चोरपांग्रा ते दुसरबीड रोडवरील एका हॉटेलनजीक बोलेरो गाडीने मोटारसायकलला जबर धडक दिल्याने एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना १८ मार्च रोजी रात्री उशिरा घडली. सोलापूर जिल्ह्यातील भोगेवाडी येथील बालाजी दिलीप काळे व ढवसळ येथील ओंकार नितीन पाटील हे दुसरबीडवरून मेहकरकडे एम.एच.४५ क्यू.६८0२ क्रमांकाच्या मोटारसायकलने जात होते. दरम्यान, समोरुन येणार्‍या एम.एच.२२ एस.४३४३ क्रमांकाच्या बोलेरो गाडीने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यामध्ये बालाजी काळे हे जागेवरच ठार झाले, तर ओंकार पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडताच बोलेरो गाडी साखरखेर्डा मार्गे भरधाव वेगात निघून गेली. लोणार पोलीस स्टेशनचे पी.आय. यशवंत बाविस्कर यांनी तात्काळ साखरखेर्डा पोलिसांशी संपर्क साधला असता, साखरखेर्डा पोलिसांनी सदर बोलेरो गाडीला रस्त्यातच अडविले; तसेच बोलेरो गाडीचालक काशिनाथ प्रल्हाद भारती रा.काजळा जि.जालना ह.मु.सावित्रीनगर औरंगाबाद याला ताब्यात घेऊन बिबी पोलिसांच्या स्वाधिन केले. यासंदर्भात सोलापूर जिल्ह्यातील ढवसळ येथील सागर रमेश पाटील यांच्या फिर्यादीवरून बिबी पोलिसांनी काशिनाथ प्रल्हाद भारती याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.