शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

शर्यतीतील बैलाने धडक मारल्याने एकाचा मृत्यू, अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील घटना

By विलास जळकोटकर | Updated: June 6, 2023 16:58 IST

बैलांची शर्यत पाहण्यासाठी म्हणून बसलेल्या व्यक्तीला बैलाने धडक देऊन काही अंतर फरपटत नेले.

सोलापूर :  बैलांची शर्यत पाहण्यासाठी म्हणून बसलेल्या व्यक्तीला बैलाने धडक देऊन काही अंतर फरपटत नेले. यात जखमी होऊन व्यक्तीचा मृत्यू झाला ही घटना रविवारी सायंकाळी 5:30 च्या सुमारास अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावात घडली. साहेबलाल मनापसाब मुल्ला (वय ६०) असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

रविवारी वागदरी गावात बैलांची शर्यत होती. ही शर्यत गाव परिसरातील मोकळ्या मैदानात ठेवण्यात आली होती. शर्यत बघण्यासाठी वागदरी गावासह परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी साहेबलाल हेही शर्यत पाहण्यासाठी तेथे गेले होते शर्यतीत धावणाऱ्या बैलाने त्यांना धडक दिली. त्यानंतर तसेच काही अंतर पुढे फरपटत नेले. यामुळे साहेब लाल हे डोक्याला, पायाला, हाताला तसेच सर्वांगास मार लागून जखमी झाले होते. त्यांच्यावर अक्कलकोट येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर मुलगा इमाम यांनी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल केले. परंतु सोमवारी रात्री उपचारादरम्यान साहेबलाल मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.