शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

कुर्डूवाडीच्या कोविड सेंटरमधून वर्षभरात दीड हजारा बाधित रुग्ण उपचार घेऊन परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:21 IST

येथील सेंटरवर प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम खाडे व त्यांचा आठजणांचा कर्मचारी वर्ग दिवस-रात्र रुग्णांची सेवा करण्यात मग्न आहेत. ...

येथील सेंटरवर प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम खाडे व त्यांचा आठजणांचा कर्मचारी वर्ग दिवस-रात्र रुग्णांची सेवा करण्यात मग्न आहेत. माढा तालुक्यामध्ये ७ जुलै २०२० रोजी कोविडचा प्रादुर्भाव वाढल्याने कुर्डूवाडी येथे संकेत मंगल कार्यालयात कोविड केअर सेंटर शासनाकडून सुरू केले. २३ नोव्हेंबरपर्यंत त्या ठिकाणी ते चालले व त्यातून ७५९ रुग्णांना सेवा मिळाली. तालुक्यातील एकमेव हे केअर सेंटर असून, येथे तालुक्‍यातील प्रत्येक गावातून आर्टिफिशिअल व रॅपिड टेस्टद्वारे तपासणी केल्यानंतर बाधित रुग्ण उपचारासाठी येेथे दाखल होतात.

या सेंटरमध्ये पहिल्या दिवसापासून सेंटरचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम खाडे यांच्यासह पूजा वाघमारे, शारदा पवार या दोन आरोग्यसेविका, सचिन झोंबाडे, अक्षय लोखंडे हे दोन कक्ष सेवक, शिवराम चांदणे, दीपक चांदणे, अक्षय पवार, अतुल धडे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे साफसफाई करण्यासाठी चार कर्मचारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ निखिता खरात व औषध निर्माता प्रिया शिंदे या येेेथे कार्यरत आहेत.

बाधित रुग्णांवरील उपचार प्रक्रिया

एखाद्या गावात पेशंट आढळल्यास त्यास सेंटरमध्ये दाखल केले जाते. त्यानंतर त्यांच्या रक्त, सीबीसीसह अन्य तपासण्या करीत दररोज त्यांची ऑक्सिजनची तपासणी केली जाते. जर एखाद्या रुग्णाला ऑक्सिजन कमी प्रमाणात दिसू लागले तर त्याला लागलीच इतरत्र हलविण्याचेही काम शासकीय रुग्णवाहिकेद्वारे हे पथक कायम करीत आहे. बाधित रुग्ण व्यवस्थित झाल्यानंतर दहा दिवसांनंतर हे पथक डिस्चार्ज देऊन त्यांना अगदी ठणठणीत करून सोडण्यात येते.

फोटो

०५कुर्डूवाडी०१

ओळी

कुर्डूवाडी येथील श्रीराम मंगल कार्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची तपासणी करताना डॉ. शुभम खाडे व त्यांचे पथक.