शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कमला एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पदस्पर्श दर्शनरांग गेली गोपाळपूरपर्यंत

By काशिनाथ वाघमारे | Updated: July 29, 2023 19:09 IST

दर्शनासाठी लागतात तब्बल पाच तास..

काशिनाथ वाघमारे, सोलापूर : आषाढी यात्रा सोहळ्यानंतर आलेल्या अधिक श्रावण महिन्यातील कमला एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दोन ते अडीच लाखांहून अधिक भाविकांनी गर्दी केली तर चंद्रभागा नदीपात्रामध्ये पवित्र स्नानासाठीही भाविकांनी गर्दी केली. पदस्पर्श दर्शन रांग पत्राशेड ओलांडून रिद्धी-सिद्धी मंदिर, गोपाळपूरपर्यंत गेली.

आज चंद्रभागा नदीत स्नान, विठ्ठल मंदिर कळसाचे दर्शन, प्रदक्षिणा घालून भाविकांनी कमला एकादशीचा सोहळा साजरा केला. प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट, दर्शन रांग व मंदिर परिसर विठुनामाच्या जयघोषाने निनादून गेला. मुखदर्शन रांगेतही भाविकांची गर्दी दिसून आली. प्रमुख संतांच्या दिंड्यांनीही चंद्रभागा वाळवंटात गर्दी केली होती. तसेच रेल्वे, एसटी, खासगी वाहनाने येणा-या भाविकांची संख्याही मोठी होती.दर्शनासाठी लागतात तब्बल पाच तास..

कमला एकादशीच्या पूर्वसंध्येला दर्शन रांगेत जवळपास लाखाहून अधिक भाविक होते. मात्र, एकादशीच्या दिवशी या गर्दीमध्ये लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे पदस्पर्श दर्शनासाठी तब्बल पाच ते सहा तास लागले. त्यामुळे शनिवारी सकाळच्या सत्रात मुखदर्शनाच्या रांगेतही प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले. तरीही जवळपास एक ते दीड लाख भाविकांनी मुखदर्शनाचा लाभ घेतला.

टॅग्स :Adhik Maasअधिक महिनाPandharpurपंढरपूर