शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

नर्सिंग कॉलेज मधील मुलीची होस्टेल मध्ये गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:26 IST

बार्शी : बार्शी येथील बी.एस्सी. नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीने फस्ट इयरच्या परीक्षेत सलग दोन वेळा नापास झाल्याने होताच ...

बार्शी : बार्शी येथील बी.एस्सी. नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीने फस्ट इयरच्या परीक्षेत सलग दोन वेळा नापास झाल्याने होताच नाराज होऊन तिने होस्टेल मध्ये ओढणीच्या साहाय्याने छतास गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी या होस्टेल मधील रूम नं. ११ मध्ये ही घटना घडली.

गळफास घेतलेली सायली शिवाजी जगताप (वय- २२, रा. पालसिंगण ता. जिल्हा बीड) येथील आहे. तिने मागील वर्षी याच नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. त्यावर्षी झालेल्या परीक्षेत एका विषयात पास होऊन चार विषयात नापास झाली होती. त्यात तिला एटीकेटी मिळाल्याने त्यावर दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश घेऊन दोन्ही वर्षाचा अभ्यास करत होती. त्यानंतर तिने दिलेल्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री लागला होता. त्यातही पहिल्या वर्षाच्या परीक्षेत ही पुन्हा नापास झाली. त्यामुळे नाराज होऊन तिने शनिवारी सकाळी होस्टेल मध्ये राहत असलेल्या रूम नं.११ मधील छतास ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत वसतिगृहाच्या रेक्टर संजोती काळे यांनी पोलिसात खबर दिली.

ही घटना शहर पोलिसांना समजताच पोसई नामदेव सस्ते, फौजदार प्रवीण सिरसट व पोलीस नाईक श्रीमंत खराडे यांनी जाऊन या घटनेचा पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यास पाठविले.

----

सायली जगताप